Panaji Municipal Corporation Dainik Gomantak
गोवा

Panjim: रोहित मोन्सेरात यांचा विक्रम, पाचव्यांदा महापौरपदी बिनविरोध निवड; उपमहापौरपदी संंजीव नाईक विराजमान

Panaji Municipal Corporation: पणजी महापालिकेच्या महापौरपदी रोहित मोन्सेरात तर उपमहापौरपदी संजीव नाईक यांची बिनविरोध निवड झाली.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी : पणजी महापालिकेच्या महापौरपदी रोहित मोन्सेरात तर उपमहापौरपदी संजीव नाईक यांची बिनविरोध निवड झाली. महापालिकेच्या विशेष सभेत आयुक्त क्लेन मदेरा यांनी ही घोषणा केली. या पदांसाठी अन्य कुणीही अर्ज न भरल्याने दोघांची बिनविरोध निवड झाल्याचे मदेरा यांनी घोषित केले.

रोहित मोन्सेरात महापौरपदी पाचव्यांदा तर संजीव नाईक यांची चौथ्यांदा उपमहापौर बनले आहेत. बिनविरोध पाचव्यांदा निवड होण्याचा मोन्सेरात यांचा हा विक्रम आहे. यावेळी विरोधी गटातील नगरसेवकांसह ८ नगरसेवक अनुपस्थित राहिले.

महापौर व उपमहापौर निवडीनंतर महापालिकेच्या विविध समित्यांची निवड करण्यात आली. स्थायी समितीमध्ये महापौर रोहित मोन्सेरात यांच्यासह अस्मिता केरकर, करण पारेख, विठ्ठल चोपडेकर, कॅरोलिना पो आणि नरसिंह मोरजकर आहेत.

आरोग्य आणि बाजार समितीत बेंटो लोरेना, लोरेन डायस, संतोष सुर्लीकर, आदिती चोपडेकर, शुभदा शिरगावकर आणि प्रसाद अमोणकर यांचा समावेश आहे.

बांधकाम समितीमध्ये शुभम चोडणकर, सिल्वेस्टर फर्नांडिस, प्रमय माईणकर, प्रांजल नाईक, डेनिस एडवर्ड फ्रांसिस जॉर्ज व नेल्सन काब्राल तसेच महिला आणि बालकल्याण समितीत सेंड्रा कुन्हा, दिक्षा माईणकर, शायनी चोपडेकर, मनिषा मणेरकर व वर्षा शेट्ये यांची निवड झाली आहे. महापौर रोहित मोन्सेरात म्हणाले, सध्याचे हे शेवटचे वर्ष असून पुढील वर्षी पणजी महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत त्यामुळे जे प्रश्‍न व समस्या बाकी आहेत त्या सोडवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

स्मार्ट सिटीच्या कामांमुळे सध्या शहरात पार्किंगसाठी जागा मिळणे मुश्कील बनत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी शहरात टॅक्सी पार्किंगला बंदी आणली आहे. यामुळे स्थानिकांना काही प्रमाणात वाहने उभी करण्यासाठी जागा उपलब्ध होईल. शहरातील पार्किंग व अन्य वाहतूक समस्यांबाबत आज वाहतूक खाते आणि वाहतूक पोलिस पाहणी करणार आहेत. त्यातून काही तोडगा निघण्याची शक्यता आहे. - रोहित मोन्सेरात

मान्सूनपूर्व कामे सुरू

राजधानी पणजी शहरात भिकाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, याकडे आम्हाला गांभीर्याने लक्ष द्यावे लागणार आहे. महापालिका कार्यालय अन्यत्र स्थलांतर करण्यास पर्यायी जागा मिळत नसल्याने नव्या इमारतीच्या बांधकामाचा प्रश्‍नही भिजत पडला आहे.

पणजी बाजाराचा प्रश्न देखील लवकरच सुटेल. महापालिकेतर्फे मान्सूनपूर्व कामे सुरू झाली आहेत. आज स्मार्ट सिटी आणि सार्वजनिक बांधकाम खात्यासोबत बैठक होणार असून काही ठिकाणी सांडपाणी निचरा वाहिनी जोडली नसल्याची तक्रार आली आहे. हे व अन्य मुद्दे बैठकीत मांडण्यात येतील, असे महापौर मोन्सेरात यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

चेहऱ्यावर थकवा, शब्द अडखळले; दिल्लीत उपचार घेऊन परतलेल्या मंत्री सिक्वेरांनी शांतपणे LOP युरींना दिले उत्तर

IND vs ENG: प्रसिद्ध कृष्णा अन् जो रुटमध्ये जोरदार बाचाबाची! मैदानावर घडला हाय व्होल्टेज ड्रामा; अंपायरला करावी लागली मध्यस्थी VIDEO

Mahadevi: वनतारा 'महादेवी'ला परत करण्यास तयार? माहिती देऊन कोल्हापूरच्या खासदाराने 10 मनिटांतच पोस्ट केली Delete

Goa Assembly: टोंका येथील पशुवैद्यकीय रुग्णालयाची स्थिती बिकट, जेनिफर मोन्सेरात यांनी वेधलं सरकारचं लक्ष; वाचा दिवसभरातील घडामोडी

Viral Video: नदीत पिकअप आणि मगरीचा थरार...! धडकी भरवणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल; नेटकरी हैराण

SCROLL FOR NEXT