Panaji Mayor Dainik Gomantak
गोवा

Panaji: 2021 च्या जोडीचे पुनरागमन! रोहित यांचा महापौर, आगशीकरांचा उपमहापौरपदासाठी अर्ज

Panaji Mayor: पणजी महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी रोहित मोन्सेरात आणि उपमहापौरपदासाठी वसंत आगशीकर यांनी शुक्रवारी सकाळी आपला उमेदवारी अर्ज सादर केला.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: पणजी महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी रोहित मोन्सेरात आणि उपमहापौरपदासाठी वसंत आगशीकर यांनी शुक्रवारी सकाळी आपला उमेदवारी अर्ज सादर केला. दोन्ही पदांसाठी दोघांचेच अर्ज असल्याने त्यांच्या निवडीची केवळ औपचारिकता बाकी राहिली आहे.

२०२१ मध्ये झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर रोहित मोन्सेरात महापौर तर आगशीकर यांची उपमहापौरपदी निवड झाली होती. त्यामुळे ३० तारखेला दोघांच्या नावांची घोषणा झाल्यानंतर या जोडीचे आता पुन्हा सत्तास्थानी पुनरागमन होणार आहे, हे स्पष्ट झाले आहे.

निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याप्रमाणे शुक्रवारी सकाळी महापौर रोहित मोन्सेरात आणि नगरसेवक वसंत आगशीकर यांनी आपापले उमेदवारी अर्ज अकाऊंट ऑफिसर बेनार्ड यांच्याकडे सुपुर्द केले. दोन्ही नावांचे प्रस्ताव अनुक्रमे नगरसेवक विठ्ठल चोपडेकर आणि प्रज्योत वायंगणकर यांनी दिले. निवडीच्या सर्व प्रक्रिया शुक्रवारी पार पाडल्या गेल्या.

त्यामुळे सोमवार, ३० रोजी महापौर-उपमहापौर पदाच्या निवडीची घोषणा केली जाईल. दरम्यान, आगशीकर निवडणूक लढवण्याच्या मनस्थितीत नसतानाही मंत्री बाबूश यांनी त्यांना निवडणूक लढवण्यास राजी करून रिंगणात उतरविले होते.

१० ते १२ नगरसेवक उपस्थित

रोहित मोन्सेरात व वसंत आगशीकर हे उमेदवार अर्ज भरणार असल्याने इतर २५ नगरसेवक उपस्थित राहतील, असे वाटत होते; परंतु केवळ दहा ते बारा नगरसेवकांनी उपस्थिती लावल्याचे दिसून आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mazi Bus Scheme: खासगी बसचालकांसाठी खुशखबर! 'माझी बस' योजनेत किलोमीटरमागे 5 रुपये अनुदान; जुन्या बस बदलण्यासाठी 10 लाखांपर्यंत मदत

Congo School Fire: कांगो हादरले! दोन शाळांमध्ये भीषण अग्निकांड, 26 विद्यार्थ्यांचा मृत्यू; थरकाप उडवणारा VIDEO समोर

खरी कुजबुज: काँग्रेस-भाजपमधील शीतयुद्ध

Viral: 8 कोटींचे दागिने घालून नववधू मंडपात; पण व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांची एन्ट्री अन् वराला ठोकल्या बेड्या! नेमकी भानगड काय? Watch Video

Goa Crime: पर्वरी गोळीबाराचा कट उघडकीस येणार? यूपी-मुंबईतील तिघांना अटक; पोलिसांसमोर मुख्य सूत्रधाराचा शोध घेण्याचं मोठं आव्हान

SCROLL FOR NEXT