Minister Babush Monserrate Dainik Gomantak
गोवा

Panaji Market: 'सोपो'चा गैरवापर करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा! पणजी मार्केट पाहणीनंतर मोन्सेरात यांचे निर्देश

Babush Monserrate: मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी मार्केटची पाहणी करून स्थितीचा आढावा घेतला. पाहणीवेळी त्यांनी सोपोचा गैरवापर करणाऱ्या व्यावसायिकांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले.

Sameer Panditrao

Babush Monserrate About Sopo Issue At Panaji Market

पणजी: पणजी मार्केटमध्ये सोपो घेतलेल्या व्यावसायिकांकडून नियमांचे उल्लंघन होत असल्याचे समोर आले आहे. सोपो घेतल्यानंतर विक्री न झालेल्या वस्तू घरी नेण्याऐवजी मार्केटमध्येच मोठ्या प्रमाणावर साठवून ठेवत असल्यामुळे जागेचा गैरवापर होत आहे.

यामुळे इतर किरकोळ विक्रेत्यांना जागा मिळत नाही आणि मार्केटमध्ये अडथळे निर्माण होत आहेत. या पार्श्वभूमीवर मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी मार्केटची पाहणी करून स्थितीचा आढावा घेतला. पाहणीवेळी त्यांनी सोपोचा गैरवापर करणाऱ्या व्यावसायिकांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले.

महानगरपालिकेचे आयुक्त क्लेन मदेरा, मार्केट कमिटीचे अध्यक्ष बेन्तो लोरेना, नगर अभियंता व्यंकटेश सावंत आणि अन्य अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मार्केटच्या व्यवस्थापनाचा आढावा घेण्यात आला.

दुकानांचे रूपांतर गोडावूनमध्ये!

सीसीपी मार्केट कमिटीचे अध्यक्ष बेन्तो लोरेना यांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्केटच्या पहिल्या मजल्यावर विक्रीसाठी दिलेल्या दुकाने काही व्यावसायिकांनी गोडावूनमध्ये रूपांतरित केली आहेत. वस्तू विक्रीसाठी दिलेल्या जागेचा मालसाठवणीसाठी वापर करणे हे नियमांचे उल्लंघन असल्याने, साठवणीसाठी जागा हवी असल्यास त्यांनी मार्केटबाहेर दुकान घ्यावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

आयुक्तांकडून अहवाल; लवकरच कारवाई!

सीसीपी आयुक्त क्लेन मदेरा यांनी यासंदर्भात लवकरच अहवाल तयार करून योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे. मंत्री मोन्सेरात यांनीही, जर प्रत्येक विक्रेत्याने आपले राहिलेले सामान घरी नेले, तर जागेचे योग्य नियोजन होईल आणि पदपाथवर बसलेल्‍या व्यापाऱ्यांना अधिक सुविधा मिळतील, असे सांगितले.

एका नावावर १० सोपे; सुपरमार्केट उभारले!

सोपोसंदर्भातील नियमांनुसार एका व्यक्तीला फक्त एकच सोपो दिला जातो, मात्र काही व्यावसायिकांनी एकाच नावावर १० सोपे घेतले असून, त्यांनी येथे स्वतःचे सुपरमार्केट उभारल्याचे आढळले आहे. हे संपूर्णपणे नियमबाह्य असल्याने अशा व्यावसायिकांना त्वरित सोपो खाली करण्याचा आदेश सीसीपी आयुक्तांनी दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT