goa roadside dead body case Dainik Gomantak
गोवा

Panaji: पार्किंगमधील सरकारी वाहनात आढळला मृतदेह, पणजीतील घटनेने खळबळ; ‘संशयास्पद मृत्यू’ म्हणून गुन्हा नोंद

Panaji Junta House dead body: पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी जीए-०१-जी-१६८८ या नोंदणी क्रमांकाच्या टाटा सुमो गाडीत एका ४० ते ४५ वयोगटातील पुरुषाचा मृतदेह आढळला.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: राजधानीतील प्रसिद्ध शासकीय इमारत असलेल्या जुन्‍ता हाऊसच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या सरकारी वाहनातून अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याने शुक्रवारी खळबळ उडाली. याप्रकरणी पणजी पोलिसांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता अंतर्गत तपास सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी जीए-०१-जी-१६८८ या नोंदणी क्रमांकाच्या टाटा सुमो गाडीत एका ४० ते ४५ वयोगटातील पुरुषाचा मृतदेह आढळला. माहिती मिळताच पणजी पोलिस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी बिएनएसएसच्या कलम १९४ ‘संशयास्पद मृत्यू’ म्हणून गुन्हा नोंद करून तपासाला सुरुवात केली आहे.

पोलिसांनी घटनास्थळी सविस्तर पंचनामा करून प्राथमिक तपास पूर्ण करून मृतदेह गोवा वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या शवागारात पाठवण्यात आला आहे. घटनास्थळी किंवा मृतदेहाजवळ पोलिसांना कोणतेही ओळखपत्र अथवा संशयास्पद वस्तू आढळली नसल्याने मृत व्यक्तीची ओळख अद्यापही पटलेली नाही.

पळून आलेला मुलगा सापडला

रेल्वे तपासनिसाच्या सतर्कतेमूळे उडुपी येथील बोर्डिंग हॉस्टेलातून पळून गेलेला एक १३ वर्षीय विद्यार्थी सापडला. मागाहून त्याला उडुपी येथील रेल्वे सुरक्षा दलाच्या ताब्यात देण्यात आले.

मंगळूर एक्स्प्रेसमधील एस ३ या डब्यात प्रवास करताना हा अल्पवयीन मुलगा तिकीट तपासनीस राघवेंद्र शेट्टी यांना आढळून आला. चौकशी केली असता शाळेच्या हॉस्टेलमधून तो पळून आल्याचे स्पष्ट झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistani Actress Video: "भारतीय पुरुष पाकिस्तानी मुलींसाठी वेडे...", पाक अभिनेत्रीच्या दाव्याने सोशल मीडियावर वाद, व्हिडिओ VIRAL

Viral Post: "आता तरी गंभीर व्हा!" विजयाचा पत्ता नाही अन् पराभवांचे रेकॉर्ड्स; नेटकऱ्यांनी गौतम गंभीरला धरलं धारेवर

Goa Crime: मांद्रेत धक्कादायक प्रकार, 6 जणांच्या टोळक्याकडून वृद्ध पती-पत्नीसह मुलाला मारहाण; प्रॉपर्टीच्या वादातून राडा!

Benaulim Beach: एव्हरी डे इज ए गुड डे! फिशरमन पेलेचा बम्पर कॅच; विद्यार्थ्यांनीही घेतले मासेमारीचे धडे Watch Video

VIDEO: स्पेनमध्ये भीषण अपघात! दोन हाय-स्पीड ट्रेनची समोरासमोर धडक; 21 प्रवाशांचा मृत्यू, 70 हून अधिक जखमी

SCROLL FOR NEXT