Jetty  Dainik Gomantak
गोवा

Panaji Jetty: पणजी जेटीमधून मासिक 41.16 लाख उत्पन्न, शापोरा प्रकल्प मात्र सुधारणेच्या प्रतिक्षेत

Panaji Jetty Income: मत्स्य विभागाकडील नऊ जेटींपैकी पणजी येथील एक भाग भाड्याने देण्यात आला असून तो एम/एस डेल्टा प्लेजर क्रूझ कंपनी प्रा. लि. यांना देण्यात आला आहे.

Sameer Panditrao

पणजी: मत्स्य विभागाकडील नऊ जेटींपैकी पणजी येथील एक भाग भाड्याने देण्यात आला असून तो एम/एस डेल्टा प्लेजर क्रूझ कंपनी प्रा. लि. यांना देण्यात आला आहे. येथून विभागाला दरमहा ४१,४६,१७५ रुपये उत्पन्न मिळते. भाडेपट्ट्याचा कालावधी २२ मे २०२२ ते २१ ऑगस्ट २०२५ असा असून, प्रत्येक ११ महिन्यांनंतर १०% दरवाढ लागू करण्यात येत असल्याची माहिती विभागाने दिली आहे.

मत्स्य विभागाने शापोरा मासेमारी लँडिंग केंद्राच्या सुधारणा प्रकल्पाचा प्रस्ताव तयार केला असून, यात जेटीचे बांधकाम आणि सुरक्षा कक्ष, स्वच्छतागृह आदी सुविधांचा समावेश असेल. मात्र, या प्रकल्पाला अद्याप केंद्र सरकारची मंजुरी मिळालेली नाही. मत्स्य विभागाने केंद्र शासनाकडे शापोरा जेटीच्या सुधारणेसाठी सविस्तर प्रकल्प अहवाल पाठविला आहे.

तसेच, जल व वीज सल्लागार सेवा या संस्थेला या प्रकल्पाचे कार्यान्वयन करण्यासाठी नियुक्त केले आहे. हा प्रकल्प प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेखाली तसेच राज्य सरकारच्या निधीतून पूर्ण केला जाणार आहे. मात्र, केंद्र सरकारकडून अद्याप निधी मंजूर झालेला नाही, त्यामुळे कामास विलंब होत असल्याचे विभागाने नमूद केले.

शापारो जेटीचा प्रकल्प रखडला

राज्यातील एकूण नऊ जेटी मत्स्य विभागाच्या मालकीच्या असून, त्याद्वारे मासेमारीसह विविध उपक्रम चालवले जातात. शापोरा जेटीच्या सुधारणेमुळे स्थानिक मच्छीमारांना मोठा फायदा होईल, मात्र निधी मंजुरीच्या प्रक्रियेमुळे हा प्रकल्प रखडलेला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Cricket Association Audit: जीसीएचा कारभार वादात! 50 कोटींच्या व्यवहारांवर लेखापरीक्षणात गंभीर आक्षेप; चौकशीची मागणी

VIDEO: 'अमेरिका-पाक युद्ध झाल्यास भारत पाकिस्तानसोबत!'; राजस्थान भाजप प्रदेशाध्यक्षांच्या वक्तव्यावरुन राजकीय गदारोळ, काँग्रेस-आप आक्रमक

Horoscope: नोकरीत बढती अन् तगडा आर्थिक लाभ! आजचा शुक्रवार ठरवणार तुमचे नशीब; कोणत्या राशींना मिळणार भाग्याची साथ?

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

SCROLL FOR NEXT