Panaji
Panaji  Dainik Gomantak
गोवा

Panaji News : मेडिक्लेमचा आता तीन तासांत निकाल; ‘आयआरडीए’कडून नवे नियम जारी

गोमन्तक डिजिटल टीम

Panaji News :

पणजी, पॉलिसीधारकांना चांगली सेवा मिळावी, यासाठी भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने (आयआरडीए) नियमांत अनेक सुधारणा केल्या आहेत.

नवीन नियमांनुसार आता विमा कंपन्यांना एका तासाच्या आत कॅशलेस क्लेम मंजूर करणे आणि हॉस्पिटलमधून डिस्चार्जसाठी अंतिम आधिकारिक मान्यता तीन तासांच्या आत देणे आवश्यक आहे. तसेच विमाधारकांना आरोग्य पॉलिसींच्या वार्षिक नूतनीकरणासाठी एक महिन्याचा वाढीव कालावधी देण्यात आला असून त्या कालावधीत नूतनीकरण केलेल्या पॉलिसीअंतर्गत लाभ विमाधारकाला देणेही कंपन्यांना बंधनकारक आहे.

नव्या नियमांनुसार, उपचारादरम्यान मृत्यू झाल्यास रुग्णालयात ताबडतोब ‘क्लेम रिव्ह्यू कमिटी’च्या मंजुरीशिवाय कंपन्या दावा नाकारू शकत नाहीत.

दाव्यांच्या पूर्ततेसाठी, विमाकर्त्यांनी विमाधारक आणि त्रयस्थ प्रशासक (थर्ड पार्टी ॲडमिनिस्ट्रेटर) यांनी रुग्णालयांकडून कागदपत्रे गोळा केली पाहिजेत आणि विमाधारकाकडून त्यांची मागणी करू नये, असे परिपत्रकात म्हटले आहे.

नियमांतील ठळक बदल

विमा कंपन्यांना एका तासात कॅशलेस दावे मंजूर करणे आणि हॉस्पिटलमधून डिस्चार्जसाठी अंतिम मान्यता तीन तासांत देणे आवश्‍यक.

आरोग्य पॉलिसी नूतनीकरणास महिन्याचा वाढीव कालावधी.

पॉलिसी कालावधी दरम्यान कोणताही दावा न केल्यास त्याबद्दल विमाधारकास बक्षीस देण्याची विमा कंपन्यांना मुभा.

एकापेक्षा अधिक आरोग्यविमा पॉलिसी असल्यास, विमाधारक ती पॉलिसी निवडू शकतील, ज्या पॉलिसीअंतर्गत स्वीकार्य दाव्याची रक्कम मिळू शकते. इतर विमा कंपन्यांकडून शिल्लक रकमेच्या सेटलमेंटमध्ये प्राथमिक विमाकर्त्यास समन्वय साधता येईल.

पॉलिसी कालावधीत कोणताही दावा न केल्यास, विमा कंपन्या पॉलिसीधारकांना ‘नो क्लेम बोनस’ देऊ शकतील.

पॉलिसी कालावधीत कोणत्याही वेळी पॉलिसी रद्द करण्याचा निर्णय विमाधारकाने घेतल्यास, त्याला मुदत संपलेल्या कालावधीचा परतावा मिळेल.

सर्व वैयक्तिक आरोग्य विमा पॉलिसी नूतनीकरणक्षम आहेत आणि त्या नाकारल्या जाऊ शकत नाहीत.

विमा कंपन्यांना प्रत्येक पॉलिसी कागदपत्रांसोबत ग्राहक माहिती पत्र (सीआयएस) द्यावे लागेल, ज्यामध्ये विमा प्रकार, विमा रक्कम, कव्हरेज तपशील, अपवाद, वजावट आणि प्रतीक्षा कालावधी यासारखी वैशिष्ट्ये सोप्या शब्दांत मांडावी लागतील.

विम्याच्या रकमेत वाढ वगळता इतर गोष्टींसाठी नवीन अंडररायटिंगची आवश्यकता नाही.

विमाकर्त्यांना १००% कॅशलेस क्लेम सेटलमेंटकडे प्रवृत्त करण्यास प्राधान्य.

विमाधारकाला परवडतील अशा सर्व रुग्णालयांना व आरोग्य सेवा प्रदात्यांना विविध श्रेणीअंतर्गत समाविष्ट करण्याचे कंपन्यांना निर्देश.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Top News: चोर्ला घाट अपघातात तरुण ठार, कन्‍हैयाकुमार मृत्यूप्रकरणी खूनाचा गुन्हा नोंद; राज्यातील ठळक बातम्या

Goa Education: गोव्यात आता ITI मध्ये करता येणार दोन नवे कोर्स, 15 जुलैपासून सुरुवात; CM नी दिली महत्वाची माहिती

Bicholim News: कारवर कोसळले झाड; बैलासह म्हशीची सुटका

Assagao Demolition: आसगाव प्रकरणात CM आणि लोबो दाम्पत्याचा हस्तक्षेप! वकिलाचा युक्तीवाद, पूजाला जामीन मिळणार का?

Goa News: ...आणि मुख्यमंत्रीही झाले वारकरी !

SCROLL FOR NEXT