Panaji  Dainik Gomantak
गोवा

Panaji News : गोमंतक साहित्य सेवक मंडळ निवडणूक; रमेश वंसकर गटाचे तिसऱ्यांदा वर्चस्व

Panaji News : पुर्ण पॅनल रमेश वंसकरांच्या नेतृत्वाखाली विजयी झाले. अनुजा जोशी, नितीन कोरगावकर व प्रमोद कारापुरकर हे विरुद्ध उभे होते.

गोमन्तक डिजिटल टीम

Panaji News :

पणजी, गोमंतक साहित्य सेवक मंडळाच्या निवडणूकीत रमेश वंसकर यांची अध्यक्ष म्हणून तिसऱ्यांदा निवड झाली.त्यांना १०१ मते प्राप्त झाली तर विरुद्ध असलेल्या अनुजा जोशी यांना केवळ २९ मते मिळाली.

उपाध्यक्ष म्हणून श्री विठ्ठल गावस आणि कोषाध्यक्ष म्हणून राजमोहन शेटये हे संस्थेवर बिनविरोध निवडून आले आहेत. २ कार्यवाहसाठी एकूण तीन अर्ज आले होते त्यात सुहास बेळेकर यांना ९९ मते, महादजी प्रभुदेसाई यांना ७९ मते तर चित्रा क्षीरसागर हिला ४१ मते प्राप्त झाली. ही कार्यकारिणी पुढील तीन वर्षासाठी असेल.

पुर्ण पॅनल रमेश वंसकरांच्या नेतृत्वाखाली विजयी झाले. अनुजा जोशी, नितीन कोरगावकर व प्रमोद कारापुरकर हे विरुद्ध उभे होते.

निवडणूक बेकायदेशीरच होती. त्याचे तीव्र पडसाद आमसभेत उमटलेच. निरूत्तर आणि उघडी पडलेली कार्यकारिणी हे या कबुलीचेच चित्र होते.

गैरव्यवहार मी माझ्या भूमिकेतच मांडले होते. त्यामुळे सग्यासोय-यांनी भरलेल्या मतदार यादीमुळे आमचा पराभव होणे हे अटळच होते. गैरव्यवहारांची भांडाफोड झाली तेव्हाच आमचा विजय झाला होता. त्यामुळे हा पराभव हा आमचा थोर नैतिक विजय आहे.

- डाॅ. अनुजा जोशी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

October 2026 Rules Change: 1 ऑक्टोबरपासून बदलणार 9 मोठे नियम! खिशाला लागणार कात्री, महागाई आणि बचतीवर होणार परिणाम; सणासुदीच्या तोंडावर आर्थिक झटका

Asian Games 2026: तिरंदाजीत भारताची 'गोल्ड' हॅटट्रिक! पुरुष कंपाउंड संघाने मिळवला रोमांचक विजय; फायनलमध्ये चीनला दिली मात

Kharif Sowing Area Decline: पेरणीखालील क्षेत्र घटले, तरी खरीप उत्पादनाला फटका नाही; रब्बीसाठी केंद्राचे 177.72 दशलक्ष टनांचे लक्ष्य

Lucky Zodiac Signs: राहू-केतूची उलटी चाल ठरणार वरदान! 'या' राशींच्या आयुष्यात येणार सुख, संपत्ती आणि समृद्धी; मिळणार बक्कळ पैसा

Goa Water Crisis: राज्य गंभीर पाणी संकटाच्या दिशेने; सत्तरीतील नद्या सप्टेंबरमध्येच तळाला, 31 टक्के पावसाची तूट

SCROLL FOR NEXT