Panaji Traffic Problem Dainik Gomantak
गोवा

Panaji Traffic Control: रस्त्यालगतची बेवारस वाहने अखेर हटली

जी-२०’मुळे कृती : वाहतूक नियंत्रण कक्षाची रात्री उशिरापर्यंत कारवाई

गोमन्तक डिजिटल टीम

Panaji Traffic Problem: रस्त्याच्या बाजूला पाहुणे म्हणून बराच काळ मुक्काम ठोकणाऱ्या बेवारस वाहनांवर सध्या वाहतूक नियंत्रण खात्याने कारवाई सुरू केली आहे.

मुख्य सचिवांच्या आदेशान्वये ही कारवाई सुरू झाल्याचे सांगण्यात येते. ‘जी-२०‘ मुळे रस्त्याच्या बाजूला धूळखात असणारी वाहने उचलून त्यांचे विविध ठिकाणी स्थलांतर करण्यास सुरूवात झाली आहे.

पणजीतील सर्व मार्गांवर एक किंवा त्यापेक्षा जास्त बेवारस वाहन दिसून येतात. बराच काळ धूळखात असणाऱ्या वाहनांच्या क्रमांकावरून मालकांशी संपर्क साधला जात आहे. ज्यांचा संपर्क होत नाही, किंवा बेवारसपणे ठेवली गेली आहेत, ती वाहने टोईंग करून नेली जात आहेत.

शहरात रस्त्याच्या बाजूला अनेक दिवसांपासून धूळ खात पडलेली वाहनेही उचलण्यास आता वाहतूक नियंत्रण खात्याच्या पोलिसांनी सुरू केले आहे. सरकारी आदेशान्वये ही कारवाई सुरू आहे.

रविवारी हटवली १५ वाहने

रविवारी वाहतूक नियंत्रण कक्षाने १५ वाहने उचलली. सोमवारीही रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती. ‘जी-२०‘च्या बैठका गोव्यात होणार असल्याने राजधानीचा लूक पालटला जाणार आहे.

कित्येक वर्षांनी शहरातील सर्व रस्त्यांवर डांबर पडले आहे. त्याशिवाय रस्त्याच्या इमारतींनाही सरकारी खर्चातून रंगरंगोटी करण्यात येत आहे. संरक्षक भिंती, इमारतीचा भाग, अगदी दुकानांचे शटरसुद्धा रंगविले जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

Delhi Protest: आंदोलकांचा धूर अन् लोकशाहीचे अश्रू! 'क्रॉक्रोच जनता पार्टी'च्या आंदोलनाने फाडला व्यवस्थेचा बुरखा; जे. पी. नड्डांची मध्यस्थी ठरली उशिराची अक्कल?

History Of Hunger Strike in India: गांधीजींच्या सत्याग्रहापासून वांगचूक यांच्या उपोषणापर्यंत! भारतातील 'अहिंसक शस्त्रा'चा संघर्ष अन् सरकार समोरील मोठे आव्हान

खरी कुजबुज: ‘वाळवी’ने पेटवलेला वणवा

SCROLL FOR NEXT