पणजी: दिवसभर कष्ट करून थकलेले शरीर घेऊन फुटपाथवर विसावलेल्या एका मजुराची झोप अखेरची ठरली. पहाटेच्या सुमारास भरधाव वेगाने आलेली कार अचानक फुटपाथवर घुसली आणि तेथे झोपलेल्या मजुराला चिरडले. या भीषण अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला.
पणजी मार्केटमधील बसस्थानकाजवळ बुधवारी पहाटे सुमारे ३.१५ वाजता हा अपघात घडला. याप्रकरणी कारचालक मनजीत सिंग याला पणजी पोलिसांनी अटक केली आहे. प्राथमिक माहितीनुसार, पांढऱ्या रंगाच्या हॅचबॅक कारवरील चालकाचे अचानक नियंत्रण सुटले.
नियंत्रणाबाहेर गेलेली कार रस्त्यावरून थेट फुटपाथवर चढली. त्यावेळी तेथे झोपलेल्या मजुराला कारची जोरदार धडक बसली. धडक एवढी भीषण होती की, त्याला सावरण्याची किंवा जीव वाचवण्याची संधीही मिळाली नाही. काही क्षणांतच त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पणजी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.