Food Security Day  Dainik Gomantak
गोवा

Food Security Day : पणजीत अन्न सुरक्षा दिन साजरा

Food Security Day : जागतिक अन्न सुरक्षा दिन दरवर्षी ७ जून रोजी साजरा केला जातो. या वर्षीच्या जागतिक अन्न सुरक्षा दिनाची संकल्पना ही ‘अन्न सुरक्षा: अनपे​क्षित परिस्थितीसाठी तयार’ ही आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Food Security Day :

पणजी, अन्न आणि औषध प्रशासन गोवा यांनी जागतिक अन्न सुरक्षा दिन आपल्या कार्यालयात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने ५० हून अधिक अन्न व्यवसाय चालकांना विशिष्ट प्रशिक्षण आणि अन्न सुरक्षेबाबत माहिती देण्यात आली.

जागतिक अन्न सुरक्षा दिन दरवर्षी ७ जून रोजी साजरा केला जातो. या वर्षीच्या जागतिक अन्न सुरक्षा दिनाची संकल्पना ही ‘अन्न सुरक्षा: अनपे​क्षित परिस्थितीसाठी तयार’ ही आहे. ही संकल्पना अन्न सुरक्षेच्या घटनांसाठी तयार राहण्याचे महत्त्व अधोरेखित करते, मग ते कितीही सौम्य किंवा गंभीर असू शकतात. अन्न सुरक्षेसाठी धोरणकर्ते, अन्न सुरक्षा अधिकारी, शेतकरी आणि अन्न व्यवसाय चालकांना यांच्याकडून समर्पित प्रयत्नांची आवश्यकता आहे. यात ग्राहक देखील सक्रिय भूमिका बजावतात.

हा कार्यक्रम साजरा करण्यासाठी एफडीए गोवाने फोसटेक प्रशिक्षण आयोजित केले ज्यामध्ये नोंदणी प्रमाणपत्र असलेल्या ५० पेक्षा जास्त अन्न व्यवसाय चालकांना प्रशिक्षण देण्यात आले. हे प्रशिक्षण डी एन्ड डी स्ट्रॅटेजिक कन्सल्टिंगने आयोजित केले होते, जी एफएसएसएआय मान्यताप्राप्त फोसटेक प्रशिक्षण कंपनी आहे.

अन्न सुरक्षा अधिकारी साफिया खान यांच्या स्वागतपर भाषणाने झाली. एफडीए गोवाच्या संचालक ज्योती सरदेसाई यांनी अन्नजन्य रोगांचा प्रसार रोखण्यासाठी दररोज अन्न सुरक्षेचे महत्त्व सांगितले. अन्न सुरक्षा ही ग्राहकांसह सर्व भागधारकांची सामायिक जबाबदारी आहे यावरही त्यांनी भर दिला.

यानंतर अन्न सुरक्षेची प्रतिज्ञा आणि त्यानंतर प्रशिक्षण देण्यात आले. उद्‌घाटन समारंभाच्या सुरुवातीला एफडीए संचालक ज्योती सरदेसाई , एफडीए गोवा, लेखाधिकारी जेताहजी, वरिष्ठ वैज्ञानिक चंद्रकांत कांबळी वरिष्ठ एफडीए, अधिकारी संज्योत कुडाळकर आणि क्लिऑन डायसस यांच्या हस्ते पारंपरिक दीपप्रज्वलन करण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

AFC League: FC Goa सनसनाटी निकालासाठी सज्ज! ‘अल झाव्रा’विरुद्ध रंगणार लढत; परदेशी खेळाडूंवर भिस्त

PM Modi Birthday: "मोदीजी दूरदर्शी नेते" मुख्यमंत्र्यांनी केले खास ट्विट; 75व्या वाढदिवसानिमित्त गोव्यातून शुभेच्छांचा वर्षाव

Mhadei Tiger Reserve: म्हादईत व्याघ्र प्रकल्प होणार का? CEC येणार गोव्यात; गोवा फाउंडेशन-वन अधिकाऱ्यांत खडाजंगी

Goa Live Updates: तिस्क-उसगाव येथे कार व बुलेट यांच्यात अपघात

Goa Politics: खरी कुजबुज; रवी पात्रावचे बॅनर्स फाडण्याचा ‘प्रताप’

SCROLL FOR NEXT