Panjim Goa Dainik Gomantak
गोवा

Panjim Goa: कोळंबी खरेदीसाठी तुटून पडले गोंमतकीय; पणजीत मत्स्यव्यवसायाच्या विभागाबाहेर लांबच लांब रांग Watch Video

Panjim: राज्यात सध्या पावसामुळे समुद्रात मासेमारीस बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळं नागरिकांना ताज्या समुद्री मासळीचा स्वाद घ्यायला मिळत नाहीय.

Sameer Amunekar

पणजी: राज्यात सध्या पावसामुळे समुद्रात मासेमारीस बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळं नागरिकांना ताज्या समुद्री मासळीचा स्वाद घ्यायला मिळत नाहीय. मात्र, शुक्रवारी (११ जुलै) पणजीतील मत्स्यव्यवसाय विभागाने नागरिकांसाठी पांढऱ्या पायांची कोळंबी विक्रीस आणली होती. या विक्रीसाठी विभागाच्या कार्यालयाबाहेर स्थानिक नागरिकांची मोठी गर्दी पहायला मिळाली. कोळंबी खरेदीसाठी नागरिकांनी रांग लावली होती.

प्रथम येणाऱ्यास प्राधान्य

या कोळंबीची किंमत फक्त ३५० रुपये किलो इतकी ठेवण्यात आली होती. विक्री "प्रथम येणाऱ्यास प्राधान्य" या तत्त्वावर सुरू होती, त्यामुळे लवकर येणाऱ्यांना कोळंबी मिळाली, तर उशिरा आलेल्यांना रिकाम्या हाताने परतावे लागलं. एक व्यक्ती जास्तीत जास्त २ किलो कोळंबी खरेदी करू शकतो, अशी अट ठेवण्यात आली होती.

मत्स्यव्यवसाय विभागातर्फे २०० किलो कोळंबी विक्रीसाठी आणण्यात आली होती. ही कोळंबी थेट मत्स्य प्रकल्पातून आणलेली असल्याने नागरिकांमध्ये तिची मागणी अधिक होती. शुद्ध, दर्जेदार आणि स्वस्त दरातील कोळंबी मिळणार, या आशेने नागरिकांनी मोठ्या संख्येने विभागाच्या कार्यालयात गर्दी केली होती.

१३० ते १४० नागरिकांनी कोळंबी खरेदी केली. काही तासांतच सगळी कोळंबी संपली आणि विभागाला ३५० रुपये प्रति किलो दराने सुमारे ७० हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. याआधी विभागातर्फे एला ओल्ड गोवा येथील फिश फार्ममध्ये असा प्रयोग करण्यात आला होता.

राज्यात सध्या जोरदार पावसामुळे मासेमारी बंद असून, त्यामुळे बाजारात ताजी मासळी दुर्मिळ झाली आहे. त्यामुळे मत्स्यविभागाच्या या प्रयोगामुळे खवय्यांना शुद्ध, दर्जेदार कोळंबीचा आस्वाद घेता आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Terrorist Attack: पाकिस्तान पुन्हा हादरला! बलुचिस्तानमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; 9 पाकिस्तानी सैनिक ठार

Mungul Firing Case: मुंगुल गोळीबार प्रकरणी गोवा पोलिसांची मोठी कारवाई, 7 अटकेत, 15 जणांविरोधात गुन्हा दाखल

Shubman Gill: गिलने रचला इतिहास! सलग चौथ्यांदा जिंकला ICC 'प्लेअर ऑफ द मंथ' अवॉर्ड; अशी कामगिरी करणारा ठरला जगातील पहिला खेळाडू

Cricket News: क्रिडाविश्वात खळबळ, 34 वर्षीय स्टार खेळाडूनं सोडला देश, आता या' देशाकडून खेळणार क्रिकेट

Goa Crime: डॉक्टर निघाला ठग! 1.41 लाखांचे दागिने लंपास; 9 गुन्हे दाखल झालेला ऑर्थोपेडिक सर्जन अडकला

SCROLL FOR NEXT