Devidas Chandrakant Konadkar  Dainik Gomantak
गोवा

Mopa Airport: खून प्रकरणानंतर मोपात सतर्कता; शेकडाे मजुरांची पडताळणी

Mopa Airport:आणखी संशयित अटकेत मोपा पोलिस ठाण्याच्या हद्दीत आतापर्यंत १ हजार ६७० मजुरांची पडताळणी झालेली आहे, तर २०५ भाडेकरूंची नोंद आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Mopa Airport

देविदास कोनाडकर खुनाच्या घटनेनंतर मोपा मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प परिसरात राहणाऱ्या परप्रातीय भाडेकरूंची पडताळणी करण्याची मोहीम तीव्र करण्यात आली आहे.

मोपा पोलिस ठाण्याच्या हद्दीत आतापर्यंत १ हजार ६७० मजुरांची पडताळणी झालेली आहे, तर २०५  भाडेकरूंची नोंद आहे.

दाडाचीवाडी-धारगळ येथे झालेल्या देविदास कोनाडकर  खून प्रकरणाला आता वेगळे वळण लागले आहे. मालवाहू रिक्षाच्या मालकाने वाहन चालवण्याचा परवाना, बॅच याची तपासणी न करता रिक्षा भाड्याने कशी दिली याची चौकशी पोलिस करणार आहेत. पोलिस उपअधीक्षक जीवबा दळवी यांनी ही माहिती दिली.

याप्रकरणाचा तपास पूर्ण होईपर्यंत रिक्षा देणाराही पोलिसांच्या दृष्टीने संशयितच आहे, असे दळवींनी सांगितले. या प्रकरणातील संशयित करू सिंग याला पेडणे पोलिसांनी मंगळवारी रात्री निगळ येथे अटक केली तर लोकांनी संशयावरून पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलेल्या अन्य दोघांची पोलिसांनी प्राथमिक चौकशीनंतर मुक्तता केली.

याप्रकरणी अटक केलेल्या संशयितांना १० दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. दरम्यान, कोनाडकर यांचे कुणाशीही शत्रुत्व नव्हते. पकडलेल्या संशयितांनीच त्यांचा खून केला, असे त्यांच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे. संशयितांनी कोनाडकर यांना रस्त्यावर पडल्यानंतर सुऱ्याने त्यांचा कान कापला. रिक्षाचा धक्का दिल्यानंतर स्कूटर डाव्या बाजूने पडली असताना त्यांचा कान नंतर उजव्या बाजूला सापडला होता, असे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले.

बदला घेण्याच्या उद्देशानेच संशयितांकडून दुष्कृत्य

दरम्यान, पकडलेल्यांकडून पोलिसांनी माहिती घेतली असता येळवान - वारखंड  येथे ते संशयित भाड्याच्या खोलीत राहात होते. कंपनीतर्फे त्यांचा भाडेकरू म्हणून अर्ज भरलेला आहे.

संशयित हे मोपा विमानतळासाठी  काम सुरू असलेल्या इन्फ्रा इंडिया कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत  कंत्राट घेतलेल्या कंत्राटदाराकडे  नोकरीला आहेत. विमानतळाच्या सभोवताली काटेरी तारांचे कुंपण घालण्याचे त्यांचे काम आहे.

त्यांच्याकडे  मालवाहू   रिक्षा चालविण्याचा परवाना, बॅच वगैरे काहीही नसल्याचे पोलिस तपासात आढळून आले आहे. गुन्ह्यासाठी वापरण्यात आलेली मालवाहू  रिक्षाही ते ज्या कंत्राटदाराकडे कामाला आहेत त्याने  कामासाठी लागणारे साहित्य वैगेरे नेण्यासाठी काही दिवसांपूर्वी महिन्याला २० हजार रुपये  भाडेपट्टीवर  घेतली होती. हीच रिक्षा घेऊन  संशयित १२ मे रोजी नागझर बाजारातून साहित्य नेण्यासाठी आले होते.

तिथे संशयितांनी रिक्षा योग्यप्रकारे पार्क न केल्याने  वाहतुकीला त्रासदायक ठरू शकते म्हणून कोनाडकर यांनी त्यांना जाब विचारला व अभिषेक सिंग याला थप्पड लगावली. त्यानंतर कोनाडकर स्कूटरने घरी जाताना रिक्षाचालक मोहित कुमार याने त्याचा बदला घेऊया, असे सांगून रिक्षाने  पाठलाग करून लोकवस्ती नसलेल्या ठिकाणी स्कूटरला मागून रिक्षाचा धक्का देऊन पाडले, अशी जबानी संशयितांनी पोलिस कोठडीत दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Omkar Elephant: 'ओंकार हत्ती' गोव्याच्या महामार्गावर! वाहतूक ठप्प; तोर्सेत पाडला बांबूचा फडशा

Mapusa Roads: नेहमीचीच रड! कोट्यवधी खर्चून डांबरीकरण केले, ते पावसात गेले वाहून; चतुर्थी उलटून गेली तरी म्हापशातील रस्ते 'जैसे थे'

PM Modi Birthday: "हॅपी बर्थडे, फ्रेंड", पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसाला ट्रम्पचा फोन

Water Metro Goa: 'वॉटर मेट्रो'साठी पथक गोव्यात दाखल! करणार जलमार्गांचा अभ्यास; मांडवीच्या पात्राची तपासणी

Mapusa: भंगार वेचण्याच्या बहाण्याने आल्या, 'स्क्रू-ड्रायव्हर' घेऊन घुसल्या घरात; म्हापशात चोरीचा डाव उधळला; एका महिलेला अटक

SCROLL FOR NEXT