Nepali citizens voters in Panaji goa Dainik Gomantak
गोवा

Panaji: धक्कादायक! पणजी मतदार यादीत एका पानावर आढळले 5 नेपाळी; गोम्स यांचा खुलासा

Panaji Nepali Voters: गोम्स पुढे म्हणाले, जर प्रत्येक राजकीय नेता आपल्या मर्जीतील बीएलओ आणि मामलेदाराला हाताशी धरून अवैध नावे यादीत घुसवू लागले तर त्याचा विपरीत परिणाम होईल.

Sameer Panditrao

पणजी: राज्यातील मतदार यादीत सावळा गोंधळ करण्याचा प्रकार सुरू आहे. पणजीतील बीएलओच्या बदलीच्या पार्श्‍वभूमीवर ज्यावेळी मतदार यादीची तपासणी केली, त्यावेळी असे आढळून आले, की पणजी मतदारसंघाच्या यादीतील एका पानावरच तब्बल पाच नेपाळी नागरिकांची नावे आढळली.

मतदार यादीत विदेशी नागरिकांची नावे कशी येऊ शकतात? अशा प्रकारे अवैध मतदार जरी ७ ते ८ टक्क्यांनी प्रत्येक मतदार संघात वाढले तरीदेखील निवडणुकीचा निकाल बदलू शकतो. गोमंतकीयांच्या मताला काहीच मोल राहणार नाही. अशा प्रकारांवर कठोर कारवाई होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन निवृत्त आयएएस अधिकारी, राजकीय नेते एल्विस गोम्स यांनी सांगितले. ते पिएदाद सभागृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी ॲड. प्रतिमा कुतिन्हो, जॉन नाझारेथ उपस्थित होते.

गोम्स पुढे म्हणाले, जर प्रत्येक राजकीय नेता आपल्या मर्जीतील बीएलओ आणि मामलेदाराला हाताशी धरून अवैध नावे यादीत घुसवू लागले तर त्याचा विपरीत परिणाम होईल. त्यामुळे अशा बीएलओ आणि मामलेदारांना कठोर कारवाई करत त्यांच्यावर गुन्हे दाखल करायला हवेत, तरच ते वटवणीवर येतील.

तशी कायद्यात देखील तरतूद आहे. काही बीएलओ, मामलेदार प्रामाणिक काम करतात ते अशी अवैध नावे मतदार यादीत जोडण्यास नकार देतात, हे देखील तितकेच सत्य आहे. नागरिकांनी आपल्या मतदारसंघातील यादीत कुणाची नावे आहेत, याकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे अन्यथा आम्हा गोमंतकीयांच्या मताला काहीच मोल राहणार नाही, निवडणुकांना काही अर्थ राहणार नाही, असे त्यांनी सांगितले.

शेवटच्या टप्प्यात लक्ष ठेवा

राज्यातील मतदार यादीत जी अवैध नावे जोडली जातात, ती प्रामुख्याने शेवटच्या टप्प्यात जोडली जातात. कारण, त्यावेळी पुरवणी यादी जोडली जाते, त्याकडे निवडणुकीच्या धाकधुकीत कोणाचे लक्ष नसते, परंतु यापुढे आम्ही अधिक सतर्क होणे गरजेचे असल्याचे मत गोम्स यांनी व्यक्त केले.

निवडणुकीत लोंढे!

मतदार यादीत अनेक अवैध नावे जोडली जातात. शेजारील राज्यातील झारखंड, ओडिसातील नागरिकांची नावे यादीत आहेत, अशांचे लोंढे मोठ्या प्रमाणात रेल्वे आणि बस भरून गोव्यात निवडणुकी दरम्यान दाखल होत असतात. अनेक परराज्यातील महिला प्रसूतीसाठी गोव्यातील सरकारी हॉस्पिटलमध्ये आणले जाते जेणेकरून जन्मस्थान येथील असल्याने मतदार ओळखपत्र बनविणे सुलभ जाईल. या प्रकारांवर आळा घालणे गरजेचे असल्याचे ॲड. प्रतिमा कुतिन्हो यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

इंडिगोच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; गोवा-इंदूर फ्लाईटची हायड्रॉलिक सिस्टीम लँड होण्यापूर्वी बिघडली, 140 प्रवाशांनी रोखले श्वास

Jagdeep Dhankhar Resigns: जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा; दिलं 'हे' कारण

Mumbai Goa Highway: 'कोकणच्या माणसाची कोणाला पडलेलीच नाहीय...', महामार्गावर खड्डेच खड्डे; मनसे नेत्यानं शेअर केला Video

IND vs ENG 4th Test: इंग्लंडमध्ये जस्सी बनणार किंग! 'हॅटट्रिक'सह बुमराह रचणार नवा रेकॉर्ड; दिग्गजाला सोडणार मागे

VIDEO: बंद खोलीतून आवाज ऐकून दरवाजा उघडला, आत पाहताच नवरा थक्क!

SCROLL FOR NEXT