वेंगुर्लेकर फाईन आर्ट केंद्राचे उद्‌घाटन करताना ‘पद्मश्री’ प्रसाद सावकर. Dainik Gomantak
गोवा

पणजीत विविध कलांचे केंद्र; कलाकारांना हुरूप

वेंगुर्लेकर फाईन आर्टचे उद्‌घाटन: मान्‍यवरांनी उधळली स्‍तुतिसुमने

दैनिक गोमन्तक

पणजी: प्रा. महेश वेंगुर्लेकर यांनी हे विविध कलांना एकत्र आणणारे केंद्र व्रत म्हणून स्वीकारले आहे. असे केंद्र पणजीत होत आहे ही भाग्याची गोष्ट आहे. वेगवेगळ्या क्षेत्रांतील तज्ज्ञ, प्राज्ञ आणि सुज्ञ हे इथे जमतील तेव्हा कलाकृतींच्या आशयावर गप्पा व्हायला हव्यात, असे मत लोककला तथा लोकसंस्कृतीचे व्यासंगी विद्वान ‘पद्मश्री’ विनायकराव खेडेकर यांनी येथे व्यक्त केले.

चित्रकला, शिल्पकला, साहित्य, संगीत, नृत्य, नाट्य अशा विविध कलांना सामावून घेणाऱ्या वेंगुर्लेकर फाईन आर्ट केंद्राचे सांतिनेज येथील सिल्व्हिओ हाईट इमारतीत शनिवारी उद्‌घाटन झाले. यावेळी प्रमुख पाहुणे या नात्याने खेडेकर बोलत होते.

ज्येष्ठ गायक ‘पद्मश्री’ प्रसाद सावकर, साहित्यिक तथा समीक्षक डॉ. सोमनाथ कोमरपंत व गोवा कला महाविद्यालयाचे माजी प्राचार्य तथा प्रतिथयश चित्रकार दत्ता नावेलकर यांचीही उपस्‍थिती होती.पं. सावकर यांनी विविध कला एका केंद्रात आणण्याची महेश वेंगुर्लेकर यांची संकल्पना उत्तम आहे असे सांगितले. तसेच प्रत्येक कला या एकमेकांना पूरक असतात. नाटकातही साहित्य, संगीत, नृत्य, चित्र या कलांचा समावेश असतो. कलाकार निरंतर अस्वस्थ असतो, असे ते म्‍हणाले.

डॉ. कोमरपंत म्‍हणाले, कलाकार हा निरंतर अस्वस्थ असतो. म्हणूनच चित्रकला हा ध्यास आणि श्वास असलेले वेंगुर्लेकर निवृत्तीनंतर कार्यप्रवण झाले आहेत. या कलाभूमीचे दान या भूमीला द्यावे हे त्यांना वाटणे स्वाभाविक आहे. यातून त्यांचे प्रेयस आणि श्रेयस त्यांना प्राप्त होवो. इथे गुरूच्या ऋणातून मुक्त होण्याचा प्रयत्न त्यांनी, कला केंद्रात आपल्या गुरुचे सर्वप्रथम चित्रप्रदर्शन ठेवून केला आहे याचेही कौतुक वाटते.

या सोहळ्याचे सूत्रसंचालन सिद्धी उपाध्ये यांनी केले. गौरी वेंगुर्लेकर यांनी मान्यवरांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान केला. यावेळी कला क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

गुरुवंदना प्रदर्शनाचे उद्‌घाटन

वेंगुर्लेकर कला केंद्राच्या उद्‌घाटनाला प्रारंभाचा कार्यक्रम म्हणून, प्रा. वेंगुर्लेकर यांनी आपले गुरू प्रा. दत्ता नावेलकर यांच्या चित्रकृतींचे प्रदर्शन भरविले आहे. ते 22 मार्चपर्यंत खुले असेल. यावेळी दत्ता नावेलकर म्हणाले, चित्रकला हा माझ्या जीवनाचा भाग आहे. चित्रकलेसाठी मी प्राचार्यपदही त्यागले. महेश वेंगुर्लेकर यांनी जो हा प्रकल्प सुरू केला आहे त्याला माझे नेहमीच आशीर्वाद असतील.

कला महाविद्यालयात 20 वर्षे कला शिक्षक व 20 वर्षे प्राचार्य होतो. कला एकसूरी, एकलकोंडी असू नये असे नेहमीच वाटायचे. त्यामुळे शिकवताना इतर कलांबद्दलही बोलायचो, माहिती द्यायचो. निवृत्तीनंतर माझी कल्पना आज प्रत्यक्षात येत आहे. विविध कला प्रतिभेचा शोध घेण्याचा यामागे उद्देश आहे. दर्जा राखून प्रस्थपितांबरोबरच उभरत्या कलाकारांना इथे व्यासपीठ दिले जाईल.

- प्रा. महेश वेंगुर्लकर

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa Live Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

Goa Tourism: परदेशी की भारतीय? कोणत्या पर्यटकांमुळे होतोय फायदा, व्यावसायिकांनी दिलेलं उत्तर वाचा

SCROLL FOR NEXT