Crime News: निर्वस्त्र, सडलेल्या अवस्थेत आढळला 20 वर्षीय तरूणीचा मृतदेह; बलात्कार करून हत्या केल्याचा संशय

Jharkhand girl body found: झारखंडच्या खूंटी जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली असून, कर्रा पोलीस ठाणे हद्दीतील मुरहू–कटमकुकु जंगल परिसरात एका सुमारे २० वर्षीय युवतीचा मृतदेह आढळून आला.
Crime News
Crime NewsDainik Gomantak
Published on
Updated on

झारखंडच्या खूंटी जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली असून, कर्रा पोलीस ठाणे हद्दीतील मुरहू–कटमकुकु जंगल परिसरात एका सुमारे २० वर्षीय युवतीचा मृतदेह आढळून आला आहे. हा मृतदेह निर्वस्त्र अवस्थेत आणि गंभीर जखमेच्या खुणांसह सडलेल्या स्थितीत सापडल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला असून, युवतीची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

स्थानिक ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनंतर कर्रा पोलिस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. जंगलातील मुख्य वाटेपासून काही अंतरावर हा मृतदेह पडलेला आढळून आला. मृतदेहाची अवस्था पाहता ही घटना काही दिवसांपूर्वी घडली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. घटनास्थळाची सखोल तपासणी सुरू असून, परिसरातील प्रत्येक पुराव्याची बारकाईने पाहणी केली जात आहे.

मृतदेहाची स्थिती आणि घटनास्थळावरील काही बाबी पाहता अत्याचारानंतर हत्या झाल्याची शक्यता तपासाधीन असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. घटनास्थळी एक दगड, काही केसांचे तुकडे, कपड्यांचे अवशेष आढळल्याची माहिती असून, ते सर्व फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

Crime News
Goa Nightclub Fire: 'ही दुर्घटना म्हणजे भाजप सरकारच्या भ्रष्ट व्यवस्थेने घेतलेले बळी'! हडफडे अग्नितांडवावरून विरोधकांचा हल्लाबोल

ही घटना ज्या ठिकाणी घडली आहे तो परिसर खूंटी आणि रांची जिल्ह्याच्या सीमेवर येतो. सीमाभाग असल्यामुळे अशा दुर्गम क्षेत्रात गुन्हे घडून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न होत असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. सध्या या भागातून गेल्या काही दिवसांत बेपत्ता झालेल्या तरुणींची यादी तपासली जात असून, शेजारील पोलीस ठाण्यांशी समन्वय साधून तपास अधिक वेगाने केला जात आहे.

Crime News
Super Cup 2025: जल्लोष! FC Goa सुपरडुपर हिट; सलग दुसऱ्यांदा जिंकला कप, अनेक विक्रमांना गवसणी

दरम्यान, याच परिसरात यापूर्वीही अशा प्रकारची घटना घडल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. एप्रिल महिन्यात देखील याच विभागात एका युवतीचा मृतदेह आढळून आला होता, ज्याप्रकरणी आरोपींना अटक करण्यात आली होती. एकाच भागात वारंवार गंभीर गुन्हे घडत असल्याने महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com