Panaji Theft Case Dainik Gomantak
गोवा

Panaji Theft Case: पणजीत चोरट्यांचा धुमाकूळ! पार्क केलेल्या कारची काच फोडून 'इतक्या' हजारांच्या रोकडसह PMLA खटल्यांचे पुरावे लंपास

Panaji theft case involving cash and PMLA evidence: पणजी चर्च परिसरात उभ्या केलेल्या कारची काच फोडून चोरट्यांनी रोख रकमेसह सुमारे ९० हजार रुपये किमतीचा ऐवज आणि महत्त्वाची कायदेशीर कागदपत्रे असलेली हँडबॅग चोरून नेली.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: पणजी चर्च परिसरात उभ्या केलेल्या कारची काच फोडून चोरट्यांनी रोख रकमेसह सुमारे ९० हजार रुपये किमतीचा ऐवज आणि महत्त्वाची कायदेशीर कागदपत्रे असलेली हँडबॅग चोरून नेली. या प्रकरणी पणजी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.

दाबोळी येथील रहिवासी मिशा सांतोरिया यांनी आपली कार पणजी चर्चकडून पाटो-आल्तिनोकडे जाणाऱ्या रस्त्यावर पार्क केली होती. सायंकाळी ५.३० ते ७.३० या वेळेत चोरट्यांनी कारच्या मागील डाव्या बाजूची काच फोडून आत प्रवेश केला आणि हँडबॅग चोरून नेली.

चोरीला गेलेल्या काळ्या रंगाच्या हँडबॅगमध्ये १० हजार रुपये रोख, आयसीआयसीआय बँकेचे क्रेडिट कार्ड, वाहनचालक परवाना, पॅन कार्ड, आधार कार्ड आणि बार कौन्सिल कार्ड होते. याशिवाय परफ्यूमची बाटली, ॲपल मॅकबुकचा चार्जर, दोन आयफोन चार्जर, अॅपल लाइटनिंग केबल आणि पॉवर बँक यांचाही समावेश होता.

पेन ड्राइव्हही चोरीला!

या हँडबॅगमध्ये दोन फ्लॅटच्या कार्यालयांच्या चाव्या तसेच ‘पीएमएलए’ अर्थात मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत सुरू असलेल्या खटल्यांशी संबंधित महत्त्वाचे पुरावे असलेला पेन ड्राइव्हही होता. घटनेनंतर सांतोरिया यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार भारतीय न्याय संहिता, २०२३ च्या कलम ३२४(२) आणि ३०३(२) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पणजी पोलीस पुढील तपास करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Unity Ride: गोव्यात 'युनिटी राइड'चे उत्साहात स्वागत; राष्ट्रीय एकात्मतेसह अमलीपदार्थमुक्त भारताचा संदेश!

FC Goa: एफसी गोवाचा अखेर विजय! फॉर्टिस एफसीला 2-1 ने नमवत एएफसी चॅम्पियन्स लीगमध्ये गुणांचे खाते उघडले

Ranji Trophy: कसवणकर-सुयशची मेहनत वाया; गोव्याला उत्तर प्रदेशने 68 धावांनी हरविले, पराभवाची मालिका कायम

Cancer Survival AI: एआयचा चमत्कार! आता चेहरा सांगणार कॅन्सर रुग्णाचे भविष्य, नव्या संशोधनाने खळबळ; 40,000,000 हून अधिक फोटोंचा अभ्यास

Betoda Nirankal Pollution: निरंकालच्या नागरिकांना दिलासा? औद्योगिक दुर्गंधीत घट, सांडपाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले

SCROLL FOR NEXT