Panaji Car Accident  Dainik Gomantak
गोवा

Panaji Car Accident : शर्यतीच्या नादात टोंक येथे कारची तीन वाहनांना धडक

गोमन्तक डिजिटल टीम

Panaji Car Accident :

पणजी, टोंक येथून पणजीकडे येणाऱ्या मार्गावरून दुसऱ्या वाहनाला भरधाव ओव्हरटेक करण्याच्या नादात वाहनचालकाचा ताबा सुटल्याने स्विफ्ट कारने (क्र. जीए ०७ के १४७२) विरुद्ध दिशेला जाऊन तीन वाहनांना ठोकर दिली.

या धडकेत उभी केलेली दुचाकी (जीए०७ एई-७३४६) सुमारे अडीच ते तीन मीटरवर पदपथावर उडून पडली, तर मालवाहू टेम्पो आणि उभ्या कारला त्या भरधाव कारने धडक देऊन पुढे वीज खांबाचा वेध घेतला.

टोंक येथे नव्याने केलेल्या स्मार्ट रस्त्यावर सध्या भरधाव वाहने धावताना दिसतात. टोंककडून काकुलो मॉलमार्गे पणजीला येणारी दुचाकी वाहने भरधाव ये-जा करीत असतात. त्याशिवाय अधून मधून चारचाकी वाहनेही भरधाव धावतात.

शनिवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास येथील तळावलीकर शोरूमच्या समोर उभ्या असलेल्या कार, दुचाकी आणि मालवाहू टेम्पोला कारने धडक दिली. धडक दिल्यानंतर कारमधील चालकाने तेथून धूम ठोकल्याची माहिती समोर आली. या स्विफ्ट कारच्या सर्व काचा काळ्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार या कारमध्ये युवक होते आणि त्यांनी दुसऱ्या वाहनाबरोबर शर्यत लावली होती, त्यातच त्या कारच्या चालकाचा ताबा सुटला आणि ती विरुद्ध दिशेला जाऊन धडकली. त्यामध्ये उभ्या असणाऱ्या कारला (क्र. जीए०३ पी ६३१८) मागील बाजूने ती भरधाव कार घासली. उभ्या दुचाकीला धडक देऊन ती कार उत्तरेला तोंड करून असलेल्या टेम्पोला धडक धडकली.

उत्तरेला असलेले टेम्पोचे तोंड पूर्वेला झाले. टेम्पोजवळ उभ्या असणाऱ्या त्याच्या मालकाला काही प्रमाणात जखमा झाल्या. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पणजी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करीत अपघाताची नोंद केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rashi Bhavishya 18 October 2024: उत्तम द्रव्यलाभ होईल, व्यावसायिकांसाठी आजचा दिवस आशादायी

Ponda: बहिणीने धाडस केले पण भाऊ बचावला नाही; 17 तासानंतर आढळला दर्शन नार्वेकरचा मृतदेह

मेरशीत एक महिन्यापासून उभ्या जीपमध्ये आढळला मृतदेह, परिसरात खळबळ; गोव्यातील ठळक बातम्या

Goa Belgaum Highway: गोवा-बेळगाव महामार्गावरील वाहतूक ठप्प, दोन्ही बाजूला 4-5 किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा

Divar Island: पाचव्या शतकातील निर्मिती प्रक्रिया वापरुन गोव्यात उभारलं जातंय जहाज; पुढल्या वर्षी करणार गुजरात ते मस्कत प्रवास

SCROLL FOR NEXT