Panjim Bus Stand Dainik Gomantak
गोवा

Panaji Bus Stand: पणजी बसस्थानक,नव्हे समस्यांचे ‘आगर’

छत दुरूस्ती कुर्मगतीने नाल्यामुळे दुर्गंधी, गटारे खुलीच, पदपथही उखडलेले

गोमन्तक डिजिटल टीम

Panaji Bus Stand: पणजी ही राज्याची राजधानी दररोज हजारो प्रवासी येथे ये-जा करतात.कोणी कामाच्या निमित्ताने, कोणी सरकारी कार्यालयात, शिक्षणासाठी, खरेदीसाठी, व्यापारासाठी.

काही पर्यटक ‘जीवाचा गोवा’ करण्यासाठी पणजीत येतात. मात्र, राजधानीत कदंब बसस्थानकाची अवस्था समस्यांचे आगार, अशी झाली असून येथील दुरवस्था पाहता हेच का, देशातील प्रगत राज्याच्या राजधानीचे बसस्थानक? असा प्रश्‍न पडल्याशिवाय राहत नाही.

2021 साली आलेल्या तौक्ते वादळावेळी बसस्थानकातील शेडचे जे पत्रे उडाले होते, त्याच्या डागडुजीचे सध्या कुर्मगतीने सुरू आहे. कदंब बसस्थानकातील पदपथावरील लाद्या, गटारांवरील झाकणे विखुरलेली आहेत. त्यांची डागडुजी पावसाळ्यापूर्वी होणे गरजेचे आहे.

बसस्थानकाशेजारी एक नाला आहे, त्या नाल्यात गलिच्छ पाणी साचलेले आहे, तसेच अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढिगारे आहेत. त्यामुळे येथे दुर्गंधी पसरलेली आहे.

पावसाळ्यात या नाल्यातील गलिच्छ पाणी स्थानकात वाहून येते. या नाल्याची रूंदी पावसाळ्यापूर्वी वाढविली नाही, तर गलिच्छ पाणी बसस्थानकात पसरून आरोग्य समस्या उद्भवू शकतात.

पदपथ विखुरले !

कदंब बसस्थानकातील अनेक ठिकाणचे पदपथावरील पेव्हर्स विखुरले आहेत, त्यामुळे पदपथ विस्कळीत झाले आहेत. अनेक ठिकाणी योग्य काम झालेले नाही. डागडुजी केली नाही तर ते पावसाळ्यात अधिक विस्कळीत होतील.

उघडी गटारे अपघातास कारण

बसस्थानकातील काही ठिकाणी गटारे उघड्या स्थितीत आहेत. त्यांवरील झाकणे फुटली आहेत. या गटारांची जर डागडुजी केली नाही, तर बसगाड्यांचे चाक त्यात जाऊ शकते. तसेच रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही इजा पोहोचू शकते. त्यामुळे त्यांच्या डागडुजीची नितांत गरज असल्याचे प्रवासी सांगतात.

कचरापेटी कुठेय?

कोणत्याही बसस्थानकावर मूलभूत सुविधा असायला हव्यात. पणजी बसस्थानकावर मात्र, त्यांची कमतरता जाणवतेय. पाण्याची बाटली रिकामी झाल्यावर टाकायची कुठे, इतकेच काय खाद्यपदार्थ खाल्यानंतर टेट्रा पॅक किंवा रॅपर्स टाकायचे कुठे,असे प्रश्‍नही प्रवाशांना पडतात. कचरा पेटीच मिळत नसल्याने प्रवासी कचरा कुठेही टाकतात. त्यामुळे परीसरात अस्वच्छता पसरते.

पणजी स्थानकातील शेडच्या कामाला सुरूवात केली असून येत्या काळात ते पूर्ण होईल. पणजी बसस्थानकातील विविध समस्यांबाबतची कल्पना आपल्याला असून ही कामे पूर्ण करून घेण्यासाठी सहाय्यक अभियंत्यांना सूचित केले असून येत्या काळात निश्‍चितपणे या समस्या सोडविल्या जातील.

उल्हास तुयेकर, अध्यक्ष, गोवा राज्य कदंब महामंडळ.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sanjay Dutt Luxury Hotel In Goa: संजय दत्तचं गोव्यात आलिशान लक्झरी हॉटेल, उद्घाटनापूर्वीच रचला इतिहास; आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरतंय चर्चेचा विषय

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

Delhi Protest: आंदोलकांचा धूर अन् लोकशाहीचे अश्रू! 'क्रॉक्रोच जनता पार्टी'च्या आंदोलनाने फाडला व्यवस्थेचा बुरखा; जे. पी. नड्डांची मध्यस्थी ठरली उशिराची अक्कल?

SCROLL FOR NEXT