Panaji Market Dainik Gomantak
गोवा

Panaji Market : पावसामुळे भाजी उत्पादन घटले; टोमॅटोसह 'गोमंतकीय तवशी'ही महाग

कांदा, बटाटा दर स्थिर : टोमॅटोचा दर @ 150 रूपये

गोमन्तक डिजिटल टीम

Panaji Market : बाजारात खास गोमंतकीय ‘तवशी’ दाखल झाली असून शंभर रुपयांना पाच तवशी विकल्या जात आहेेत. खास फोंडा, वेर्णा परिसरात मोठ्या प्रमाणात पिक आले आहे. परंतु दर मात्र महागडेच आहेत.

पावसामुळे भाजी उत्पादनात घट झाली आहे. टोमॅटोसह, सर्वच भाजीचे दर वाढलेले आहेत. फक्त कांदा आणि बटाट्याचा दर स्थिर आहे.

टोमॅटो १४० ते १५० रुपये प्रती किलो दराने विकला जात असल्याने मध्यमवर्गीयांच्या आहारातून टोमॅटो जणू गायबच झाला आहे. स्थानिक भाजी उपलब्ध झाली असूनही दर मात्र चढेच आहेत. काकडीचे दरही शंभर रुपयांना पाच काकड्या असाच आहे.

जीवनावश्‍यक वस्तूंचे दर दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. महागाईने सर्वसामान्य तसेच मध्यमवर्गीय नागरिकांचे खिसे रिकामे होत आहेत. भाजीपाल्याच्या दरांतही मोठी वाढ झाली. येत्या काळात भाजीपाल्याचे दर आणखी वधारण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कारण बेळगावसह कोल्हापूर, सांगली, हुबळी मार्केटमध्ये भाजीची आवक कमी आहे. गेल्या आठवड्यातील पावसामुळे भाजीचे नुकसान झाले आहे. किमान वीस दिवस महागाई कायम राहणार असल्याचे व्यापाऱ्यांचे मत आहे.

रानभाज्या बाजारात दाखल

पणजी मार्केटमध्ये टायखिळा, कुडूक, फांगला, कोंब तसेच इतर रानभाज्या विक्रीसाठी येत असून त्यांना चांगली मागणी आहे.

ग्रामीण भागात रान भाज्या मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यामुळे भाजीचे दर वाढले तरी ग्रामीण भागात फारसा परिणाम झालेला नाही. सगळीकडे रानभाज्या मिळत आहेत.

फलोत्पादनातील भाजी दर

  • भेंडी ४६ रू

  • कोबी २१

  • गाजर ३७

  • फ्लावर ३५

  • हिरवी मिरची ६५

  • कांदा २४

  • बटाटे २७

  • टोमॅटो १०८

भाजी प्रतिकिलो

  • टोमॅटो १२०-१४०

  • कांदा ३०

  • बटाटा ४०

  • कारली ८०

  • भेंडी ६०

  • कोबी ४०

  • फ्लॉवर ४०

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Session Live: पोगो ठरावावरुन विधानसभेत राडा, सभापती संतापले, वीरेश बोरकरांना सभागृहातून काढले बाहेर!

IND vs ENG 4th Test: ओल्ड ट्रॅफर्डवर जो रुटचा दबदबा, द्रविड-कॅलिसला मागे टाकून रचला इतिहास; नावावर केला 'हा' मोठा रेकॉर्ड

Goa News: ऐतिहासिक! 1972 पूर्वी अभयारण्यात आलेली, सर्व्हे आराखड्यावर नोंद असलेली एक लाख घरे कायदेशीर होणार, 1 ऑगस्टपासून प्रक्रिया

New Dress Code: हाफ-स्लीव्ह, लेगिंग्सला बंदी! भारताशेजारील 'या' देशात महिला-मुलींसाठी नवा ड्रेस कोड; तालिबानी फतवा जारी

Goa Murder Case: तलवारीने केला हल्ला, डिचोलीत पतीकडून पत्नीची हत्या

SCROLL FOR NEXT