Plan Goa Trip Dainik Gomantak
गोवा

Goa Plan: ...पण गोवा पर्यटकांसाठी तयार आहे का?

गोव्यातील विविध पर्यटन स्थळे पर्यटकांसाठी खुली झाली आहेत का?

Priyanka Deshmukh

नागरिकांसह पर्यटकांनाही (Tourist) आरटीपीसीआर (RTPCR) अहवालाशिवाय गोव्यामध्ये (Goa) प्रवेश करण्यास परवानगी देण्यात आली आहे. उच्च न्यायालयाचा (Goa Court) या निर्णयामुळे संपूर्ण लसीकरण (Vaccination) झालेल्या पर्यटकांना गोव्यात एंट्री मिळाली आहे. ज्यांना गेल्या वर्षीपासून कोरोनामुळे (Covid-19) बंद घरात रहावे लागले आणि कडक निर्बंधांमुळे त्रास सहन करावा लागला त्यांच्यासाठी गोवा पर्यटनाची दारे खुली झाली आहे. परंतु सणासुदीच्या काळात गोवा ट्रीप एंजॉय करणाऱ्यांसाठी गोव्यातील विविध पर्यटन क्षेत्रे वेळेत उघडतील का?

Goa Tourism

गोव्याचे व्यावसायिक गोवा पर्यटनासाठी खुला करण्यास तयार आहेत. देशात 2 वर्षापासून सुरू असलेल्या कोरोना माहामारिमुळे देशभरातील लोकं सावध झाले आहेत. त्यातच गेल्या मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात गोवेकरांनी कोरोनामुळे गोमॅकोत झालेला मृत्यू तांडव पाहिल्याने नागरिक आणखीनच सावध झाले आहे. त्यामुळे गोव्यात प्रवेश करणाण्यासाठी पूर्ण लसीकरण आणि आरटीपीसीआर चाचणी सक्तीची करण्यात आली आहे.

Covid rules in Goa

या अटींचे पालन कारावे लागेल

पर्यटकांना मुक्त प्रवाह गोव्यात करता येणार नाही. या सगळ्या नियमांची तपासणी गोवा सीमेवर केली जाईल. दुसरे म्हणजे, गोव्यात सुरक्षा प्रोटोकॉल फॉलो करावा लागेल. त्याचबरोबर नदी, क्रूज, कॅसिनो आणि इतर अनेक वर्टिकल्स व्यवसाय सध्या सुरू होण्याची वाट तेथिल व्यावसायिक बघत आहेत. सर्व पर्यटन क्षेत्र उघडण्याची गरज आहे, असे व्यावसायिकांचे म्हणणे आहे. कोविड रूग्णांची संख्या कमी झाल्यानंतरही गोवा सरकारने पर्यटनाची दारे उघडण्यासाठी वेळ घेतला आहे.

Covid rules in Goa

सर्व पर्यटन क्षेत्र उघडणे आवश्यक

ट्रॅव्हल अँड टूरिझम असोसिएशन ऑफ गोवाचे अध्यक्ष नीलेश शहा म्हणतात, "गोवा सरकारने अद्याप निर्णय घेतला नसला तरीही पर्यटक व्यवसायाच्या बहाण्याने गोव्यात येत होते. आणि आता तर उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशामुळे पर्यटकांना आणि व्यावसायिकांना दुहेरी दुजोरा मिळाला आहे. सरकारने नदी, समुद्रपर्यटन, क्रूझ, कॅसिनो, स्पा इत्यादी उद्योगांना पु्न्हा उभारी देण्यासाठी देखील काम करणे आवश्यक आहे, जे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे पर्यटनाशी संबंधित आहेत. त्याचबरोबर सरकराने चार्टर उड्डाणे सुरू करण्याकडे देखील लक्ष दिले पाहिजे. व्हिसा मिळाल्याने गोव्यातील हॉटेल्समध्ये बुकिंग सुरू होऊ शकते."

केवळ पर्यटनावर अवलंबून असणारे अनेक व्यवसाय कोरोना साथीच्या कालात पुर्णपणे बंद पडले आहे. गोव्यात असलेल्या 3500 हॉटेलांपैकी 1,400 हॉटेलनेच संध्या कामकाज सुरू केले आहे आणि त्यापैकी 1200 हॉटेलच 15-20% उत्पादन क्षमतेने सुरू आहे. त्यामुळे हॉटेल्स चालकांचे देखिल दिवाळे निघत आहे. गोव्यातील पंचतारांकित हॉटेल्समध्ये सरासरी 55-70% नफा होतो आहे.

Hotel in Goa

पार्टी स्थळे उघडल्याने पर्यटनालाही चालना मिळेल

"गोव्यात पार्टी आणि मेजवानी हे पर्यटकांसाठी मोठे आकर्षण आहे पण तेच या कोरोना काळात बंद आहे. सावधानतेचा इशारा म्हणून आणि नियमांचे पालन करून काही व्यावसायिक हळूहळू आपली दुकाने उघडत आहेत. इव्हेंट प्लॅनर आणि डीजे बाबूंचा व्यवसाय तर पुर्णपणे ठप्पच झाला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटे नंतर गोवेकरांनी चांगलाच अनुभव घेतला आहे. त्यामुळे न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे गोवेकरांनी स्वागतच केले. मात्र पर्यटन सुरू करण्याच्या निर्णयामुळे व्यावसायिकांना खुप दिलासा मिळणार आहे. प्रत्येकाची नोकरी किंवा व्यवसाय पर्यटनावर अवलंबून आहे. महत्वाचे म्हणजे गोव्यातील नाईटलाइफ बंद असल्याने तरूणांचा हिरमोड त्याचबरोबर बर्‍याच लोकांसाठी उत्पादनाचा हा एकमेव मार्ग आहे त्यांच्या कुटुंबाचे उदरनिर्वाह या व्यवसायावर चालतो. म्हणूनच, मला वाटते की सर्व व्यवसायांना पद्धतशीरपणे नियमांचे बंदन घालून पब आणि नाईट वार सुरू करण्याचीही परवानगी दिली पाहिजे," असे डीजे मॅकेन्झी परेरा यांनी TOI ला सांगितले.

Night Life in goa

शॅक्स पुन्हा उघडण्याबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता नाही

"गोव्याच्या बीच, शॅक्स पर्यटकांसाठी चुंबक आहे असे म्हणायला हरकत नाही. विशेषतः दक्षिण गोव्यातील अनेक शॅक परदेशी पर्यटकांवर जास्त अवलंबून असतात. गोवा सरकारने या वर्षासाठी शॅक ओनर्ससाठी परवाने जारी केलेले नाहीत. "गोवा पर्यटनासाठी खुले करण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे, परंतु आम्हाला सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन करावे लागेल. बरेच स्थानिक लोक या निर्णयावर खूश नाहीत, परंतु पर्यटनावर अवलंबून असणारे व्यवसाय पर्यटकांच्या प्रतीक्षेत आहेत. आम्ही 15 सप्टेंबरनंतर शॅक बांधणे सुरू करण्याची योजना आखत आहोत. त्यामुळे सरकारला या वर्षी पुन्हा परवाने जारी करावे लागतील, आणि आम्ही त्याची वाट पाहत आहोत. आम्ही समुद्रकिनार्यावर शॅक, बीच बेड आणि खुर्च्यांसाठी परवाना शुल्क माफ करण्याची विनंती सरकारडे केली आहे," असे गोवा शॅक ओनर्स वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्ष क्रुझ कार्डोझो यांनी सांगितले.

shack in goa

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Illegal Sand Mining: सावर्डे सत्तरीत बेकायदेशीर रेती उत्खनन; एका महिलेचा म्हादईत बुडून मृत्यू

Goa Crime: तिसवाडीत 15 वर्षीय मुलीचे अपहरण, ओडिशातील तरुणाविरोधात गुन्हा नोंद; पोलिस तपास सुरु!

Tuberculosis: क्षय रोगाला हद्दपार करण्यासाठी मिळाले स्टार बूस्ट!! वर्षा उसगावकर आणि जॉन डी सिल्वा गोव्याचे 'टीबी ब्रँड ॲम्बेसेडर'

Mormugao Port: गोव्यात क्रूझ पर्यटन हंगाम सुरू; एकाच दिवशी कॉर्डेलिया आणि जर्मनीहून जहाजं दाखल

Goa Agriculture: गोव्यात यंदा पोफळीच्या लागवडीत 18 हेक्टरने वाढ! सत्तरीत सर्वाधिक लागवड

SCROLL FOR NEXT