Goa Politics
Goa Politics Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: श्री महालक्ष्मीची ओटी भरून, पल्लवी धेंपे झाल्या राजकारणात सक्रीय    

दैनिक गोमन्तक

Goa Politics:

केंद्रीय नेतृत्वाने दक्षिण गोव्यात माजी खासदार ॲड. नरेंद्र सावईकर आणि माजी उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर तसेच इतरही खासदारकीच्या उमेदवारीसाठी इच्छुक होते; परंतु त्यांना मागे टाकत उद्योजक श्रीनिवास धेंपे यांच्या पत्नी पल्लवी धेंपे यांना दक्षिणेतील उमेदवारी जाहीर करण्यात आली.

त्यांना रविवार, 24 रोजी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सोमवार, 25 रोजी त्यांनी श्रीनिवास धेंपे जे पणजी शिमगोत्सव समितीचे अध्यक्ष आहेत यांच्यासह जाऊन श्री महालक्ष्मी देवीचे दर्शन घेत ओटी भरली. त्यामुळे माहेरच्या देवाचा आशीर्वाद घेऊन एकाअर्थी राजकारणात सक्रिय झाल्याचे संकेत त्यांनी दिले.

यापूर्वी शिमगोत्सव समिती गुलालोत्सवाचे नमन करायला जायची त्यावेळी केवळ श्रीनिवास धेंपे उपस्थित असायचे त्यांच्या पत्नी पल्लवी या कधीच नसायच्या त्यामुळे त्या प्रचाराचा नारळ फोडून आशीर्वाद घेण्यासाठी आल्या आहेत, असा काहीजणांमध्ये संभ्रम निर्माण झाला.

जर पल्लवी धेंपे निवडणूक जिंकल्या तर दक्षिण गोव्यातून खासदार होणाऱ्या पहिल्या महिला उमेदवार ठरतील. भाजपने गोव्यात पहिल्यांदा महिलेला लोकसभेची उमेदवारी दिली आहे, त्यामुळे जर त्या निवडून आल्यास भाजपप्रणीत पहिल्या महिला खासदार ठरतील.

भाजप आज फोडणार प्रचाराचा नारळ
गोवा भाजपतर्फे मंगळवार, 26 रोजी दु. 3.30 वा. पणजीतील श्री महालक्ष्‍मी देवीचा आशीर्वाद घेऊन लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला जाणार आहे. उत्तर गोवा उमेदवार तथा खासदार श्रीपाद नाईक, दक्षिण गोवा उमेदवार पल्लवी धेंपे यांच्या प्रचाराला याद्वारे खऱ्या अर्थाने सुरवात होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shirgao Panchayat: शिरगाव पंचायतीत सत्ताबदल अटळ; सरपंच, उपसरपंचांविरुद्धचा अविश्वास ठराव संमत

Margao: कामतांचे हेतुपुरस्‍सर दुर्लक्ष, मुद्दाम कामे अडवतात; मडगावात कुरतरकर बहीण- भावाचा भाजपला रामराम

Pakistan Car Blast: पाकिस्तानमध्ये अफगाणिस्तान सीमेजवळ मोठा कार स्फोट; माजी खासदारासह 4 जण जागीच ठार

Goa Todays Live Update: सरदेसाईंच्या मडगावातील जनता दरबारला मोठा प्रतिसाद!

NEET Exam: गोव्यातील चार हजार विद्यार्थ्यांवर अन्याय, ‘नीट’ परीक्षा पुन्हा घेण्याची NSUI ची मागणी

SCROLL FOR NEXT