CM Dr. Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

मोठी बातमी! गोव्यात CAA अंतर्गत पाकिस्तानच्या ख्रिश्चन नागरिकाला दिले जाणार भारतीय नागरिकत्व

Citizenship Amendment Act: सदर व्यक्तीचा गोव्यातच जन्म झाला होता. पण, नंतर तो पाकिस्तानात स्थलांतरित झाला.

Pramod Yadav

Citizenship Amendment Act 2019 Goa

पणजी: नागरिकत्व सुधारणा कायदा अर्थात Citizenship Amendment Act (CAA) मार्च २०२४ रोजी देशभरात लागू करण्यात आला आहे. याच कायद्यांतर्गत गोव्यात वास्तव्यास असणाऱ्या पाकिस्तानच्या ख्रिश्चन नागरिकाला भारतीय नागरिकत्व बहाल केले जाणार आहे. गोव्यात CAA अंतर्गत दिले जाणारे हे पहिलेच नागरिकत्व आहे.

Citizenship Amendment Act ला संसदेने डिसेंबर २०१९ मध्ये मंजुरी दिली, पण त्याची अंमलबजावणी झाली नव्हती. या वर्षी मार्चमध्ये याचे कायद्यात रुपांतर झाले. नागरिकत्व सुधारणा कायद्यामुळे (CAA) ३१ डिसेंबर २०१४ पूर्वी भारतात स्थलांतर केलेल्या पाकिस्तान, बांगलादेश व अफगाणिस्तान या देशातील हिंदू, बौद्ध, जैन, पारशी, शीख व ख्रिश्चन नागरिकांना भारतीय नागरिकत्व घेता येणार आहे.

याच पार्श्वभूमीवर गोव्यात वास्तव्यास असणाऱ्या पाकिस्तानच्या ख्रिश्चन नागरिकाला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते आज (२८ ऑगस्ट) भारतीय नागरिकत्व बहाल करणार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सदर व्यक्तीचा गोव्यातच जन्म झाला होता. पण, नंतर तो पाकिस्तानात स्थलांतरित झाला. सध्या हा व्यक्ती कासावली येथे वास्तव्यास आहे. गोव्यात CAA कायद्यांतर्गत दिले जाणारे हे पहिलेच नागरिकत्व आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Economy: पैसाच पैसा! Per Capita Income मध्ये गोव्याने पटकावला दुसरा क्रमांक; मग पाहिलं कोण?

Pooja Naik: पूजा नाईकच्या अडचणीत वाढ; 'या' प्रकरणी म्हार्दोळ पोलिसांनी नोंदवला गुन्हा

Goa Live Updates: बेकायदेशीर घरांचे वीज व पाणी 'कनेक्शन कट'!

Dudhsagar Tourism: 'दूधसागर'ला पर्यटकांचा गोंधळ! तोबा गर्दीमुळे जीप पडल्या अपुऱ्या; संख्या वाढवण्याची मागणी

Leopard In Goa: सत्तरीत बिबट्याचा थरार! घराच्या अंगणात वाढला संचार; ग्रामस्थांची कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT