Goa CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Pakistan Will Split: पाकिस्तानचे दोन तुकडे होण्याच्या मार्गावर, बलुचिस्तान स्वतंत्र देश होणार; CM प्रमोद सावंत

Goa CM Pramod Sawant: १९७१ मध्ये पाकिस्तान दोन देशात विभाजित झाला आणि बांग्लादेश हा नवा देश तयार झाला. आता बलुचिस्तान हा नवा देश जन्माला देण्याची शक्यता आहे.

Pramod Yadav

पणजी: 'पाकिस्तानचे दोन तुकडे होण्याच्या मार्गावर असून, बलुचिस्तान नवा देश निर्माण होईल', अशी भविष्यवाणी राज्याचे मुख्यममंत्री प्रमोद सावंत यांनी केली आहे. रविवारी (२७ एप्रिल) भाजप कार्यकर्त्यांना संबोधित करताना मुख्यमंत्री सावंत बोलत होते. '२२ एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम हल्ल्याचा पंतप्रघान नरेंद्र मोदी १०० टक्के बदला घेतील', असा विश्वास देखील सावंत यांनी व्यक्त केला.

'पाकिस्तानमध्ये ज्याप्रमाणे हिंदू लोकांची संख्या कमी होत आहे त्याप्रमाणे भारतात मुस्लिमांची संख्या वाढत आहे', असेही सावंत यांनी नमूद केले. 'फाळणी नंतर अनेक मुस्लिम भारतात थांबले त्यानंतर त्यांची लोकसंख्या देशात वाढत असल्याचा दावा सावंत यांनी केला. पण, त्यामुळे आम्हाला काही समस्या नाही. भारत धर्मनिरपेक्ष देश आहे. येथे हिंदू, मुस्लिम आणि कॅथलिक गुण्यागोविंदाने राहतात', असे सावंत म्हणाले.

'भारत हा एक देश होता. फाळणीनंतर भारत आणि पाकिस्तान असे दोन देश तयार झाले. १९७१ मध्ये पाकिस्तान दोन देशात विभाजित झाला आणि बांग्लादेश हा नवा देश तयार झाला. आता बलुचिस्तान हा नवा देश जन्माला देण्याची शक्यता आहे', असे सावंत म्हणाले. 'बलुचिस्तान पाकिस्तानमधील सर्वात मोठा प्रदेश असून, अतिशय मागास आहे. पासकिस्तानने जबरदस्तीने हा प्रदेश बळकावला असल्याचा दावा बलोच नागरिक करतात', असे सावंत म्हणाले.

'१९९० मध्ये काश्मिरी पंडितांवर हल्ले झाले व मोठा हत्याकांड घडला. तत्कालिन राजकीय नेत्यांनी दहशतवादाला सडेतोड उत्तर न दिल्याने ते घडल्याचे मत सावंत यांनी व्यक्त केले. काँग्रेस ६० वर्षे सत्तेत होती पण, दहशतवादाविरोधात सक्त पाऊले उचचली नाहीत,' असे सावंत म्हणाले.

'काँग्रेसवर अशी वेळ का आलीय याचा विचार करा. कारण त्यांनी देशासाठी नव्हे तर स्वत:साठी काम केले. देशातील लोकांना आता हे कळले असल्याचे सावंत म्हणाले. मोदी त्यांच्या सारखे नाहीत, ते असल्या गोष्टी खपवून घेत नाहीत. पाकिस्तानी नागरिकांनी यापूर्वी देश सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पाकिस्तान दहशतवाद संपवत नाही तोपर्यंत त्यांना भारतात प्रवेश करु दिला जणार नाही', असे सावंत म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT