Goa CM Dr. Pramod Sawant Press In New Delhi Dainik Gomantak
गोवा

POK भारताचा अभिवाज्य भाग होता आणि राहिल; गोवा सीएम डॉ. प्रमोद सावंत यांचे दिल्लीत वक्तव्य

Goa CM Dr. Pramod Sawant Press In New Delhi: स्वाती मालीवाल यांच्या प्रकरणात त्यांनी अरविंद केजरीवाल यांचे उपसचिव विभव कुमार यांच्यावर देखील सावंत यांनी आरोप केले.

Pramod Yadav

Goa CM Dr. Pramod Sawant Press In New Delhi

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध ठिकाणी प्रचार करण्यासाठी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत गेल्या तीन दिवसांपासून दिल्लीत आहेत. मुख्यंत्री सावंत यांनी दिल्लीतून आपच्या अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका केली.

तसेच, पाकव्याप्त काश्मीर (POK) भारताचा अभिवाज्य भाग होता आणि राहिल, असे वक्तव्य सावंत यांनी दिल्लीत केले.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यावेळी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना धारेवर धरत सडकून टीका केली. दिल्लीचे मुख्यमंत्री स्वाती मालीवाल प्रकरणात काहीच का बोलत नाहीत, त्यांनी काहीतरी वक्तव्य कारायला हवं. त्यांचे मौन सर्वकाही सांगत असल्याचे सावंत म्हणाले.

आम आदमी पक्ष दिल्ली विरोधी आणि महिला विरोधी पक्ष झाल्याचा आरोप सावंत यांनी केला. मुख्यमंत्री याप्रकरणी काहीच बोलत नाहीत हा बेशर्मपणाचा प्रकार आहे. तसेच, केजरीवाल स्वाती मालीवाल यांच्यावर दबाव आणत असल्याचा आरोप सावंत यांनी केला.

स्वाती मालीवाल यांच्या प्रकरणात त्यांनी अरविंद केजरीवाल यांचे उपसचिव विभव कुमार यांच्यावर देखील आरोप केले.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिल्लीच्या कथित अबकारी धोरणातील घोटाळ्याचा उल्लेख करत, घोटाळ्याचा पैसा गोवा, पंजाब आणि गुजरातच्या निवडणुकीत वापरल्याचा आरोप केला. सावंत यांनी यावेळी एनडीए आघाडीचे सरकार पुन्हा देशात येत असल्याचा दावा केला.

प्रमोद सावंत गेल्या तीन दिवसांपासून दिल्लीत असून, लोकसभेसाठी भाजप उमेदवारांचा प्रचार करत आहेत. सावंत यांच्या प्रचारात केजरीवाल यांच्यावर जोरदार टीका केली. केजरीवाल यांच्या काळातील घोटाळ्यांचा उल्लेख यांनी प्रचार सभांमध्ये करत देशाला मोदींशिवाय पर्याय नसल्याचे वक्तव्य केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT