Mining Dump Dainik Gomantak
गोवा

खंदकामधील पाण्यामुळे पैरा गाव संकटाच्या छायेत

शिरगावमध्ये पाण्याचा उपसा सुरू; डिचोलीतही उपसा सुरुच

दैनिक गोमन्तक

डिचोली : डिचोलीतील अन्य खंदकातील पाणी पंपाद्वारे उपसण्यास अद्याप सुरुवात झाली नसली, तरी शिरगावमधील खंदकातील पाण्याचा उपसा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. खंदकातील पाण्यामुळे शेजारच्या गावांना धोका निर्माण झाला आहे.

मात्र, या खंदकातील पाणी पैरा गावाच्या दिशेने सोडण्यात येत असून जोरदार पाऊस झाला तर मोठी समस्या निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तशी भीतीही नागरिकांमधून व्यक्त होत आहे. चौगुले खाणीच्या खंदकातील पाणी पंपाद्वारे उपसण्यात येत आहे. शिरगावची जत्रा झाल्यानंतर या कामाला सुरवात करण्यात आली. खाण कंपनीकडून हे काम करण्यात येत आहे. सध्या काही दिवस पाऊस पडणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. त्यातच पाणी उपसा झाला तर धोका निर्माण हाेईल, अशी भीती आहे.

लामगावच्या माथ्यावरील सेसा कंपनीच्या खाणीवरील खंदकातील पाण्याचा उपसा उद्या, सोमवारपासून करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनीही तसे संकेत दिले आहेत. डिचोली शहराला लागूनच असलेला हा खंदक धोकादायक स्थितीमध्ये आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Unseasonal Rain: वाळपईत अवकाळीचा कडाका! अचानक आलेल्या पावसाच्या सरींनी नागरिकांची उडाली दाणादाण

Konkan Railway: कोकणवासियांसाठी गुड न्यूज! मुंबई ते मडगाव विशेष गाडी जाहीर; 'या' 23 स्थानकांवर असणार थांबा, पाहा वेळापत्रक

Rajasthan Royals Sale: IPL इतिहासातील सर्वात मोठी डील! 15 हजार कोटींना विकली गेली 'राजस्थान रॉयल्स'; कोण आहे नवा मालक?

Honda: सफर गोव्याची! सर्वांचे स्वागत करणारे, मोठ्या जंक्शनचे काम करणारे 'होंडा' गाव

Mangaladitya Rajyog 2026: सूर्य-मंगळाची युती, 2 एप्रिलपासून मंगलादित्य राजयोगाचा चमत्कार; 3 राशींवर होणार धनाचा वर्षाव

SCROLL FOR NEXT