सत्तरी तालुक्यातील पैकुळ गावाला जोडणारा महत्त्वाचा जुना पूल दोन वर्षांअगोदर पुरावेळी संपूर्ण मोडून पडला होता. त्यामुळे लोकांचा संपर्क तुटला होता. पण आता सरकारने अगदी दीड-दोन वर्षातच नवीन रुंद असा सुसज्ज पूल जनतेसाठी बांधून पूर्ण केला आहे. त्यासाठी साडेबारा कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.
दोन वर्षांपूर्वी जुना पूल मोडल्यानंतर सरकारच्या जलस्रोत विभागाने पर्याय म्हणून बंधाऱ्यावर फळ्या घालून लोकांना ये-जा करता येईल, अशी सोय केली होती. पण वाहने जात नव्हती. तसेच जुन्या जंगली मार्गाने वाट केली होती.
पण दोन्ही पर्याय धोक्याचे होते. याबाबत आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी त्यावेळी तातडीची बैठक रस्ता विभाग व पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत घेतली होती. राणे यांनी त्यावेळी पैकुळचा पूल दोन वर्षांतच बांधून दिला जाईल, अशीही ग्वाही जनतेला दिली होती. त्याची पूर्णत: त्यांनी सरकारच्या मदतीने केली आहे. आता पुलाची उंची व रुंदीही वाढली आहे.
२३ जुलै २०२१ रोजी सत्तरीत महापुरावेळी पैकुळचा जुना पूल कोसळला होता. आता सरकारच्या जीएसआयडीसीमार्फत नवीन पुलाची बांधणी केली आहे. त्यासाठी अंदाजे साडेबारा कोटी खर्च केले आहेत.
सत्तरीतील भूषण ठरणारा पूल बांधण्यात आलेला आहे. पुलाबाजूने लोकांना जाण्यासाठीही वाट केली आहे. रात्रीची उजेडीचाही सोय केली आहे. विश्वजीत राणे यांनी या कामासाठी वेळोवेळी पाठपुरावा केला होता. पुलावरील विजेची व्यवस्था पाहून तुम्ही शहरात आहात की काय, असेच वाटते.
अजित देसाई, नागरिक
अवघ्या दीड-दोन वर्षातच एवढा मोठा रुंद पूल बांधणे हे खरेच सरकारचे प्रशंसनीय काम आहे. त्यामुळे जनता खूश आहे. दोन वर्षे लोकांनी खूपच त्रास काढले आहेत. त्याचे चांगले फळ मिळाले आहे. मंत्री विश्वजीत राणे यांनी यासाठी महत्त्वाचे योगदान दिले आहे. जुन्या पुलावरून एकच गाडी जात होती. आता नवीन पुलावरून तीन गाड्या जातील एवढा रुंद करण्यात आला आहे. त्यामुळे वाहतुकीची चांगली सोय झाली आहे.
संतोषी नाईक, पंच, गुळेली पंचायत
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.