Padma Awards 2024 Dainik Gomantak
गोवा

Padma Awards 2024: गोव्याच्या 'भगीरथाचा' सन्मान, संजय पाटील यांना पद्मश्री जाहीर

Padma awards 2024: पाटील यांच्या निययोजनबद्ध आराखड्यामुळे त्यांनी काही काळातच डोंगरावरील पाणी भुयाराच्या माध्यमातून बागायतीत आणले.

Ganeshprasad Gogate

Padma awards 2024: फोंडा तालुक्यातील शिलवाडा सावईवेरे येथील शेतकरी संजय पाटील यांना पद्मश्री जाहीर झाल्याची माहिती मिळतेय. पाटील यांनी आपल्या कुळागरात किलोमीटरपेक्षा जास्त लांब भुयारे मारुन डोंगरावरुन पाणी आणण्याची किमया केली आहे.

त्यांच्या या कार्याची शासनाने दखल घेऊन शासनाने त्यांना हा पुरस्कार जाहीर केलाय. काही काळापूर्वी संजय पाटील यांनी शेती बागायती (कुळागर) हाच उत्पन्नाचा मार्ग ठरवत बागायतीत राबायचे निश्चीत केले.

मात्र मान्सून वगळता शेती, बागायतीत राबणाऱ्या पाटील यांना पाण्याचे प्रचंड दुर्भिक्ष्य जाणवू लागले होते. याच दरम्यान बागायती शेजारच्या डोंगरावर पाणी असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

काहीही झालं तरी बागायती फुलवायचीच या निश्चयाच्या जोरावर त्यांनी आपल्या बागायती पासून लगतच्या त्या डोंगरापर्यन्त जमिनीतून भुयारं तयार करायला सुरुवात केली.

काम कठीण आणि जोखमीचे होते. मात्र पाटील यांच्या निययोजनबद्ध आराखड्यामुळे त्यांनी काही काळातच डोंगरावरील पाणी भुयाराच्या माध्यमातून झिरपत झिरपत आपल्या शेती, बागायतीत आणले.

त्याच्या या कर्तबगारीची दखल घेऊन शासनाने त्यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर केला आहे. पुरस्कार जाहीर झाल्यावर त्यांनी "गेल्या 35 वर्षांचे श्रम फळाले आले, मला मिळालेला सन्मान हा गोव्यातील तमाम शेतकऱ्यांचा सन्मान आहे" अशी पहिली प्रतिक्रिया 'गोमंतक'सोबत बोलताना दिलीय.

गोव्यातील बहुतांश ग्रामीण भागातील लोकांचा उत्पन्नाचा मार्ग हा शेती बागायती असून बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांना पाण्याची समस्या भेडसावत असते. केवळ पाण्याअभावी कित्येकांनी शेती- बागायतींचे उत्पन्न सोडल्याचे समोर आले आहे. मात्र संजय पाटील यांची ही यशोगाथा शेती- बागायती करणाऱ्या नवीन आणि होतकरू पिढीला नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"वाघांचे मृत्यू अन् वन विभागाचे अपयश"; पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर यांचा थेट प्रहार!

Goa Crime: काकाची हत्या करून मावशीकडे घेतला आश्रय! बोरी येथील दीपक नाईक हत्या प्रकरणातील संशयित नराधम पोलिसांच्या तावडीत

Goa Accident: अटल सेतूवर विचित्र अपघात! 1 नाही, 2 नाही... 7 गाड्या एकमेकांना धडकल्या, वाहतूक विस्कळीत; Watch Video

Goa Island: बेटे आमची, गोव्याला देणार नाही; मालकीसाठी धडपडणाऱ्या कर्नाटकची कोलांटी उडी,केवळ माजाळीजवळील बेटाबाबत वाद

Goa Amar Bandekar Case: किरकोळ कारणावरून हत्या, आता न्यायालयात हिशेब! तिघांविरुद्ध खुनाचा खटला चालणार, दोषमुक्ततेचा अर्ज फेटाळला

SCROLL FOR NEXT