P Chidambaram said Congress came to power it would cancel catastrophic projects in Goa  Dainik Gomantak
गोवा

कॉंग्रेस सत्तेवर आल्यानंतर गोव्यातील विनाशकारी प्रकल्प रद्द करणार

आगामी निवडणुकीत गोव्यात काँग्रेस निश्चितच सत्तेवर येणार असल्याचा विश्वास

दैनिक गोमन्तक

डिचोली: आगामी निवडणुकीत (Goa Election) काँग्रेस (Congress) सत्तेवर आल्यानंतर राज्याचे पर्यावरणीय वैभव, पारंपरिक आणि सांस्कृतिक ठेव नष्ट करण्याच्या दृष्टीने भाजप (BJP) सरकारने आणलेले तीन मोठे विनाशकारी प्रकल्प काँग्रेस लगेचच रद्द करणार आणि या राज्याची वेगळी ओळख आणि संस्कृती टिकवून ठेवणार. अशी ग्वाही काँग्रेसचे मुख्य निवडणूक निरीक्षक पी. चिदंबरम यांनी दिली. आगामी निवडणुकीत गोव्यात काँग्रेस (Goa Congress) निश्चितच सत्तेवर येणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

काँग्रेस पक्ष केवळ निवडणूक लढविण्यासाठीच नव्हे, तर जिंकण्यासाठी आणि राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी रिंगणात उतरणार आहे. असे प्रतिपादन काँग्रेसचे जेष्ठ नेते तथा माजी केंद्रीय अर्थमंत्री पी.चिदंबरम यांनी साळ डिचोली येथे केले. डिचोली गट काँग्रेसतर्फे साळ येथील फार्म -33 येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात पी. चिदंबरम बोलत होते. यावेळी व्यासपीठावर गोव्याचे प्रभारी दिनेश गुंडू राव, प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, महिला अध्यक्षा बिना नाईक, एम. के. शेख, उत्तर गोवा अध्यक्ष विजय भिके, डिचोलीतील नेते मेघश्याम राऊत, गटाध्यक्ष नितीन परब, नझीर बेग, मुस्तफ्फा बेग, डिचोली महिला अध्यक्षा मारीया जोनिटा सौझा आदींची उपस्थिती होती.

या राज्यात सत्ता स्थापन होताना राज्याला भ्रष्टाचारमुक्त सरकार देण्याची ग्वाही दिली होती. परंतु आज या सरकारची आणि राज्याची स्थिति पाहिल्यास हे सरकार सर्वात भ्रष्टाचारी आणि बेजबाबदार सिध्द झाले आहे. राज्याला कोळसा हब करण्याचा घाट या सरकारने रचला असून राज्याची पर्यावरणीय संपन्नता आणि संस्कृती धुळीस मिळविण्याचे कारस्थान आहे. राज्यात महिला असुरक्षित असून कायदा आणि सुव्यवस्था कोलमडली आहे. बेरोजगारी लाढली असून रोजगार देण्यासाठी या सरकारकडे कोणतेच धोरण नाही. आज या राज्यात बदल घडविण्यासाठी काँग्रेस पक्ष पुढे सरसावला असून 2017 साली या पक्षाकडून घडलेली चुक पुन्हा घडणार नाही. गेल्या निवडणुकीत सर्व काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जिव तोडून कार्य केले. परंतु निवडून आलेले आमदार बेईमान ठरले त्यांनी या पक्षाचा विश्वासघात केला. हि चुक यावेळी घडणार नाही, असे जेष्ठ नेते पी.चिदंबरम यांनी यावेळी सांगितले.

गोव्याचे प्रभारी दिनेश गुंडू राव यांनी यावेळी आपल्या भाषणात, डिचोलीत काम मोठ्या प्रमाणात करायचे आहे. भाजपचा बालेकिल्ला आहे. परंतु अशक्य नाही. सर्वांनी एकजुटीने आणि आत्मियतेने काम करीत जर लोकांना काँग्रेसची धोरणे आणि भविष्यातील कार्य समजावून दिल्यास येणाऱ्या निवडणुकीत या मतदारसंघात काँग्रेस पक्षाला विजय मिळविणे मुश्कील नाही. भाजप सरकारने राज्याला आर्थिक खाईत नेले असून हे सरकार सर्वात भ्रष्टाचारी सरकार म्हणून सिध्द झालेले आहे. राज्याची परिस्थिती आज बिटक बनली असताना केंद्रातील नरेंद्र मोदी यांनीही देशातील जनतेला देशोधडीला लावले आहे.

डिचोलीतही भाजप विरोधात रोष असल्याचे या बैठकीला उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांची उपस्थिती दाखवून देत आहे. यावरूनच येणाऱ्या निवडणुकीत राज्यात काँग्रेसचे सरकार आणि डिचोलीत काँग्रेसचा आमदार असणार. गेल्या लोकसभा निवडणुकीत आपण उमेदवार म्हणून उतरलो असता काँग्रेस पक्षाला सुमारे सात हजार मते मिळाली होती. त्याच प्रकारचे श्रम जर येत्या निवडणुकीत घेतल्यास या मतदारसंघात काँग्रेसचा आमदार निवडून येण्यास वेळ लागणार नाही. डिचोलीत आलेल्या अनेक आपत्तीच्या वेळी या सरकारने लोकांना आधार दिला नाही. डिचोलीचा आमदार सभापती म्हणून आपले कर्तव्य विसरले असून त्यांना घरी बसविण्याचा निर्धार आज प्रत्येक मतदाराने केला पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी तर लोकांच्या डोक्यावर कर्जांचे डोंगर करून ठेवले आहे. बेरोजगारी वाढली असून सध्या नोकऱ्या देण्याच्या नावावर बेरोजगारांची फसवणूक करण्याच्या तयारीत हे सरकार आहे. असे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी यावेळी आपल्या भाषणात म्हटले.

गेल्या अनेक वर्षांमध्ये भाजप सरकारने अनेक समस्या निर्माण झालेल्या असून या भाजपला डिचोली मतदारसंघात हरविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. डिचोलीत जर हा बदल घडला तर संपूर्ण तालुक्यात आणि राज्यात बदल घडणार आणि काँग्रेस सत्तेवर येणार. गेल्या अनेक वर्षांपासून झालेल्या अन्याय आणि अत्याचाराविरोधात झटून भाजपला हरविल्या शिवाय आता डिचोलीतील काँग्रेस कार्यकर्ते गप्प बसणार नाही. आणि येणाऱ्या निवडणुकीत राज्यात काँग्रेसचे सरकार असणार आणि त्यात डिचोलीचा आमदार असणार, असे डिचोलीतील नेते मेघश्याम राऊत यांनी म्हटले. यावेळी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आपले लिचार आणि सल्ले मांडले. सूत्रसंचालन बाला खान गोरी यांनी केले. तर मारिया जोनिटा सौझा यांनी आभार मानले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT