Goa Vaccination Dainik Gomantak
गोवा

गोवा ठरलं 100% लसीकरण पूर्ण करणारं पहिलं राज्य

राज्यातील लसीकरण मोहीम व लसीकरण केंद्रे बंद करण्यात येणार आहेत.

दैनिक गोमन्तक

पणजी: गोव्यातील 18 वर्षांवरील 11.66 लाख लोकांचे 100% लसीकरण पूर्ण झाले आहे. या सर्व लोकांनी करोनाप्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. 18 वर्षांवरील लोकांचे 100% लसीकरण पूर्ण करणारे गोवा देशातील पहिले राज्य बनले आहे. परिणामी राज्यातील लसीकरण मोहीम व लसीकरण (Vaccination) केंद्रे बंद करण्यात येणार आहेत. मात्र, आरोग्य केंद्रांमध्ये लस उपलब्ध असणार आहे. (Goa COVID-19 Update)

कोरोनाच्या (Coronavirus) तिसऱ्या लाटेत संक्रमण दर वाढला होता. मात्र, दवाखाण्यात भरती होण्याचा दर कमी होता. कोरोंनाची लागण झालेल्या बहुतेक लोकांना सौम्य लक्षण असल्यामुळे त्यांना दवाखान्यात (Hospital) भरती व्हावे लागले नाही, असे लसीकरण मोहीमेचे प्रमुख डॉ. राजेंद्र बोरकर म्हणाले. बोरकर बुधवारी आरोग्य संचालनालयाने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

राज्यात 26 जानेवारी 2021 ते मार्च 2022 या काळात 18 वर्षांवरील लोकांसाठी लसीकरण मोहीम सुरू होती. दरम्यान, 15 ते 18 वर्षे वयोगटातील 85% मुलांचा पहिला डोस तर 65% मुलांचा दुसरा डोस पूर्ण झाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT