New Education Policy Dainik Gomantak
गोवा

New Education Policy: नव्या शिक्षण धोरणाची रूपरेषा पुढील आठवड्यात! यंदापासूनच अंमलबजावणी

लोलयेकर यांच्या मार्गदर्शनाखाली बैठकांचे सत्र सुरू

दैनिक गोमन्तक

New Education Policy: नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी राज्यात यंदापासून करण्यात येणार आहे. त्याबाबतची अधिसूचना यापूर्वीच निघाली आहे. शिक्षण खात्याने धोरण राबविण्यासाठी कंबर कसली आहे. पुढील आठवड्यात या धोरणाची रूपरेषा जाहीर होईल, असे सांगण्यात आले आहे.

शिक्षण खात्याचे सचिव प्रसाद लोलयेकर यांच्या मार्गदर्शनाखाली खात्याच्या बैठकांचे सत्र सुरू आहे. पुढील महिन्यात नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होत आहे. त्यामुळे शिक्षण खात्याच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या नव्या धोरणाची रूपरेखा लवकरच सचिव जाहीर करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

नवे राष्ट्रीय शिक्षण धोरण कधी जाहीर होणार, याविषयी शिक्षण क्षेत्रासह पालकांमध्येही कमालीची उत्सुकता आहे. तसेच ते कशा पद्धतीने राबविण्यात येणार, याकडेही लक्ष लागले आहे. पुढील आठवड्यात जाहीर होणाऱ्या नव्या शिक्षण धोरणाच्या रूपरेखेविषयी शिक्षण अभ्यासकांचे विशेष लक्ष असेल.

चर्चा आणि आढावा

अगोदरच विलंब झालेल्या धोरणानुसार केजी, किडिंगस्कूल तथा तत्सम लहानग्यांना शिक्षण देणाऱ्या केंद्रांना हे धोरण राबवावे लागणार आहे. पायाभूत शिक्षणाशी हे शिक्षण असल्याने त्याची अंमलबजावणीही योग्य पद्धतीने आणि सुलभरित्या व्हावी, यासाठी शिक्षण खाते कसोशीने प्रयत्न करीत आहे. त्यासाठी सचिव लोलयेकर यांना हे शिवधनुष्य उचलण्याची वेळ आली आहे. सध्या बैठका, चर्चा आणि आढावा असे चित्र खात्यात दिसत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT