248 उमेदवारांपैकी 28 उमेदवारांनी आपले अर्ज घेतले मागे  Dainik Gomantak
गोवा

248 उमेदवारांपैकी 28 उमेदवारांनी आपले अर्ज घेतले मागे

पंचायत प्रभाग 4 मधून मॅन्युअल सिल्वा यांची बिनविरोध निवड झाली.

दैनिक गोमन्तक

वास्को: 10 ऑगस्ट रोजी होणाऱ्या राज्यातील 186 ग्रामपंचायतच्या निवडणुकीसाठी मुरगाव तालुक्यातील एकूण 7 पंचायतीतून 220 इच्छुक उमेदवारांमध्ये लढत होणार आहे. बुधवार दि.27 जुलै रोजी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी 248 उमेदवारांपैकी 28 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले, तर कुठ्ठाळी पंचायत प्रभाग 4 मधून मॅन्युअल सिल्वा (अनुसूचित जमाती) याची बिनविरोध निवड झाली.

(Out of 248 candidates, 28 candidates withdrew their applications in goa)

मुरगाव तालुक्यातील 7 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सदर झालेल्या 283 उमेदवारी अर्ज यांची काल छाननी करण्यात आली. त्यात काहींनी एकापेक्षा जास्त अर्ज दाखल केलेले एकूण 34 अर्ज अवैध म्हणजेच सहाजिकच बाद ठरवण्यात आले होते. दरम्यान आज अर्ज मागे घेण्याच्या दिवशी 28 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. यात साकवाळ पंचायतीतून (12अर्ज), केळशी (01), चिखली (07), कासवली (05), कुठ्ठाळी (01), वेलसांव (01), चिकोळणा बोगमाळो (01) मिळून एकूण 28उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले.

दरम्यान मुरगाव तालुक्यातून साकवाळ पंचायतीतून सर्वाधिक 59 उमेदवारामध्ये लढत होणार आहे. तर सर्वात कमी उमेदवार चिकोळणा येथे 18 उमेदवारामध्ये लढत होणार आहे. त्यानंतर चिखली पंचायत (41उमेदवार), कुठ्ठाळी (३१ उमेदवार), वेलसाव (20उमेदवार), कासवली (32 उमेदवार), केळशी (19 उमेदवार), एकूण 220 उमेदवारामध्ये मुरगाव तालुक्यातून 7 पंचायतीमधून लढत होणार आहे. एकूण ७ पंचायतीत एकूण 63 प्रभाग असून 74 मतदान केंद्र 10 ऑगस्ट रोजी मतदान होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Velsao Gram Sabha: वेळसाव ग्रामसभेचा मोठा निर्णय! मेगा प्रकल्पांच्या बांधकामावर बंदी; 'कचरा, पाणी आणि रस्त्यांची भेडसावतेय समस्या

Data Protection Law: चिंता मिटली! खरेदी करताना नाही द्यावा लागणार मोबाईल नंबर, ग्राहकांच्या गोपनीयतेसाठी सरकार आणतयं नवा कायदा

Kabul Bus Accident: काबूलमध्ये भीषण अपघात, प्रवासी बस उलटून 25 जणांचा मृत्यू; 27 जखमी

Love Horoscope: जोडीदाराला थोडा वेळ द्या! अनुभवा 'मोठे' बदल; वाचा प्रेम राशीफळ

Michael Clarke Cancer: विश्वचषक जिंकवून देणाऱ्या स्टार क्रिकेटपटूला कर्करोग, पोस्ट करत दिली माहिती

SCROLL FOR NEXT