Sunburn Festival 2024 Dainik Gomantak
गोवा

Sunburn Festival: 'सनबर्न'चा गोंधळ सुरूच, ध्वनिमापक यंत्रणा बंद; चुकीच्या ठिकाणी मीटर्स बसवल्याचे आरोप

Goa Sunburn 2024: सनबर्न महोत्सवात ध्वनी प्रदूषण होते की नाही, हे तपासण्यासाठी जागोजागी ध्वनिमापन यंत्रणा बसविली आहे.

Sameer Panditrao

Incorrect placement of sound meters during Sunburn event

पेडणे: सनबर्न महोत्सवात ध्वनी प्रदूषण होते की नाही, हे तपासण्यासाठी जागोजागी ध्वनिमापन यंत्रणा बसविली आहे. मात्र, सनबर्न विरोधकांनी आज रेडकर हॉस्पिटलाला भेट दिली, त्यावेळी ध्वनी मापन यंत्रणा हॉस्पिटल इमारतीच्या मागे एका कोपऱ्यात बसविल्याचे दिसून आले.

यंत्रे बसविण्याची जागा मुद्दाम चुकीच्या ठिकाणी निवडली, जेणेकरून मोठ्या आवाजाची नोंद होऊ शकणार नाही, असा आरोप स्थानिकांनी केला. तर ओशेलबाग येथे लोकवस्तीत बसविण्यात आलेली ध्वनिमापन यंत्रणा बंद असल्याचे ग्रामस्थांनी केलेल्या पाहणीवेळी आढळून आले.

सनबर्न आयोजकांनी न्यायालयात सांगितल्याप्रमाणे लोकांना त्रास होऊ नये म्हणून उपाययोजना केली आहे का, याची पहिल्या दिवसापासून पाहणी करण्यासाठी याचिकादार भारत बागकर, महेश प्रभुदेसाई, महादेव पटेकर, रोहिदास हरमलकर यांनी उपजिल्हाधिकारी शिवप्रसाद नाईक यांची भेट घेतली असता, आमचे पथक आयोजकांवर लक्ष ठेवून आहे, असे उपजिल्हाधिकारी नाईक यांनी सांगितले.

७ जानेवारी रोजी सुनावणी

धारगळ पंचायतीने कार्यक्रम सादर करण्यास ना हरकत दाखला दिल्यानंतर ग्रामस्थांनी न्यायालयात याचिका सादर केली होती. यावर सुनावणी होऊन अनेक अटींसह सनबर्न महोत्सवाला मान्यता देऊन पुढील सुनावणी ७ जानेवारी रोजी ठेवण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VHT 2025-26: विजय हजारे ट्रॉफीचा थरार! मुंबई-दिल्लीसह 8 संघ सज्ज; पाहा उपांत्यपूर्व फेरीचं संपूर्ण वेळापत्रक

Mardol: सफर गोव्याची! तळीजवळ गेल्यावर स्वच्छ, थंड हवा फुफुस्सांत पसरते; निसर्गसंपन्न 'म्हार्दोळ'

Madhav Gadgil: पर्यावरणाचा प्रखर प्रहरी, पश्चिम घाटांचे शिल्पकार डॉ. माधव गाडगीळ काळाच्या पडद्याआड

Vijay Hazare Trophy: गोव्याची झुंज अपयशी! 'विजय हजारे ट्रॉफी'त महाराष्ट्राचा 5 धावांनी विजय, ऋतुराजची शतकी खेळी पडली 'महागात'

eSakal Comscore: मराठी मीडियात 'ई-सकाळ'चा डंका! 19.5 मिलियन युजर्ससह ठरली देशातील नंबर वन वेबसाइट

SCROLL FOR NEXT