Sattari Osea Complex Dainik Gomantak
गोवा

Sattari Osea Complex : ‘ओशिया कॉम्प्लेक्स’मध्ये अनागोंदी; स्थानिकांत संताप

Sattari Osea Complex : पार्किंग व्यवस्थाच नाही ः सांडपाणी वाहते रस्त्यावर, परिसरात दुर्गंधी

गोमन्तक डिजिटल टीम

Sattari Osea Complex :

सासष्टी, कदंब बस स्थानकाच्या बाजूला एसजीपीडीए भाजी व मासळी मार्केट लगत असलेल्या ओशिया कॉम्प्लेक्स इमारतीतील अनागोंदीबद्दल स्थानिकांतून संताप व्यक्त केला जात आहे.

प्रथम म्हणजे या इमारतीत चार सरकारी कार्यालये आहेत. कॉर्पोरेट कंपन्यांची कार्यालये, बॅंका आहेत. शिवाय कित्येक दुकानेही आहेत. दिवसांतून हजारो लोक या इमारतीला कामानिमित्त भेट देत असतात. मात्र, इथे पार्किंगची व्यवस्था नाही. त्यामुळे लोकांना रस्त्यावर व एसजीपीडीए मैदानावर वाहने ठेवावी लागतात.

या इमारतीला मूळात परवानगी दिलीच कोणी, हा प्रश्र्न उपस्थित होत आहे, असे सामाजिक कार्यकर्ते महेश नायक व कॉंग्रेसचे योगेश नागवेकर यांनी सांगितले. या इमारतीचा परिसर मुळीच आरोग्यदायी नाही. सांडपाण्याचे चेंबर्स भरलेले आहेत व घाण पाणी रस्त्यावरून वहात आहे. त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. त्याच अवस्थेत मासळी विक्रेते मासळी विकतात, भाजी, फळवाले फुले विकतात. त्यात कमी म्हणून रस्त्यावर खाण्यापिण्याचे गाडेवालेही आहेतच, अशी स्थिती या इमारतीची व परिसराची झाली आहे.

या इमारतीवर व परिसरावर आमदार, मंत्री, एसजीपीडीएचे चेअरमन नगरपालिका यांचे मुळीच लक्ष नाही. सरकारने लवकरात लवकर याची दखल घेऊन उपाययोजना करावी, अशी मागणी नायक व नागवेकर यांनी केली.

चार वर्षांपासून लिफ्ट बंदच

गेली चार वर्षे लिफ्ट चालत नाही. इमारतीत येणारे लोक कचरा फेकतात. भटकी कुत्रे, मांजरे आहेतच. तसेच रात्रीच्या वेळी स्थलांतरीत झोपण्यासाठी, दारु पिण्यासाठी ही जागा वापरतात व दारुच्या बाटल्या तिथे फेकल्या जातात, असे महेश नायक यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Contract Professors: कंत्राटी प्राध्यापकांची होणार चांदी, 'समान वेतन-समान काम' सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट

Goa Crime: गोवा फॉरवर्ड पक्ष युथ विंगच्या उपाध्यक्षावर जीवघेणा हल्ला; कारही फोडली

Julus in Goa: मडगावात ईद ए मिलाद उत्साहात साजरा

Donald Trump: आम्ही रशियासह भारतालाही गमावले! राजनैतिक संबंध विकोपाला गेल्याची ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत

Horoscope today: अनंत चतुर्दशी 2025, बाप्पाचा 'या' 4 राशींवर राहील आशिर्वाद; आर्थिक आणि कौटुंबिक जीवनात समृद्धी मिळेल

SCROLL FOR NEXT