गुणाजी मांद्रेकर व दिलीप म्हामल  Dainik Gomantak
गोवा

पेडणे येथे " महात्मा गांधी जयंती निमित्त" सेवा हीच ईश्वर सेवा" या कार्यक्रमाचे आयोजन

पेडणे येथे २ ऑक्टोबर रोजी " महात्मा गांधी जयंती निमित्ताने "सेवा हीच ईश्वर सेवा " 'कार्यक्रम, विविध क्षेत्रातील सेवा बजावणाऱ्यांचा गौरव

दैनिक गोमन्तक

मोरजी: पेडणे (Pernem) येथील नवचेतना युवक संघाने महात्मा गांधी जयंती (Mahatma Gandhi Jayanti) निमित्त 'सेवा हीच ईश्वर सेवा' या भावनेने कार्य करणाऱ्या विविध क्षेत्रातील व्यक्ती आणि पेडणे पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांचा (cleaning staff of the municipality) गौरव समारंभ (Ceremony) शनिवार दिनांक 2 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ४ वाजता सरकारी रेस्ट हाऊस सभागृह पेडणे येथे आयोजित केला आहे.

शेखर पराष्ट्येकर

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे एम.डी. व गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ.उल्हास चांदेलकर म्हणून उपस्थित राहणार आहेत. खास निमंत्रित पाहुणे म्हणून युवा उद्योजक तथा समाजसेवक विराज हरमलकर , पेडणे नगरपालिकेच्या नगराध्यक्ष उषा नागवेकर, नवचेतना युवक संघाचे अध्यक्ष कृष्णा पालयेकर उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमात राष्ट्रीय युवा पुरस्कार प्राप्त गुणाजी मांद्रेकर, राज्य शिक्षक पुरस्कार प्राप्त दिलीप म्हामल व समाजसेवक शेखर पराष्ट्येकर यांचा खास गौरव करण्यात येईल. याशिवाय पेडणे पालिकेच्या निवृत्त कर्मचारी सीताबाई किनळेकर तसेच सफाई कर्मचारी जगदीश भिवजी,प्रिती आरोलकर,राया पेडणेकर,सुगंधा मोरजकर,प्रगती पेडणेकर,सोनाली राठोड,दिपाली खरवत, सुनिता राठोड,गीता पवार ,सिद्धेश शेटकर, सुकांती मडगावकर, सोनाबाई पवार, बापू गवंडी, ज्ञानेश्वर गडेकर, सुनिता राठोड, रामनाथ पेडणेकर यांचा गौरव करण्यात येईल.

या कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन नवचेतना युवक संघाने केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Partgali Math Goa: पैंगिणीतल्या 'पर्वत कानन' स्थळी मूर्ती जड झाल्या, गायीने प्रकट होऊन जागा दाखवली; श्रीसंस्थान गोकर्ण पर्तगाळ

PAK vs SL: पाकिस्तानची पुन्हा लाज गेली! 6 चेंडूत 10 धावा जमल्या नाही, श्रीलंकेसमोर टेकले गुडघे Watch Video

Cash For Job: नोकरीसाठी पैसा दिला, तरी ‘इतका आला कुठून?’ असे विचारत ED मागे लागते; पैसे देऊन अवलक्षण

अग्रलेख: गोव्यात 'दरोडा' घालायचा विचार जरी मनात आला, तरी कापरे भरेल अशी जरब व भीती बसणे शक्य आहे..

IFFI 2025: 'जागतिक सिनेमा गोव्‍यात अनुभवता यावा, हेच आमचे प्रथम लक्ष्‍य’! NFDCचे तांत्रिक विभागप्रमुख यादव यांचे स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT