Ithe Oshalala Mrutyu Dainik Gomantak
गोवा

Sanquelim News : साखळीतील रवींद्र भवनात "इथे ओशाळला मृत्यू" नाट्यप्रयोगाचे आयोजन

दैनिक गोमन्तक डिजिटल

मातृभूमी शिक्षण संस्थेतर्फे 2 एप्रिल रोजी शिवसंस्कार आयोजित विविध स्पर्धांचा बक्षीस वितरण सोहळा साखळी रवींद्र भवन येथे सायंकाळी 5 वाजता आयोजित करण्यात आला आहे, तर रात्री ८ वाजता शिव गणेश प्रॉडक्शन निर्मित आणि गणेश ठाकूर दिग्दर्शित नाट्यसृष्टीत संपूर्ण नाटकाला वन्समोर मिळवून ऐतिहासिक कामगिरी करणारे "इथे ओशाळला मृत्यू" नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे.

सिंधुदूर्गसह मुंबई, कोल्हापूर यासारख्या अनेक ठिकाणी गाजलेल्या या नाटकाचा प्रयोग आज गोव्यातील रसिक प्रेक्षकांसाठी संस्थेच्या कार्यक्रमाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आला आहे.

तसेच यावेळी गोविंद साखळकर यांनी संग्रहित केलेल्या ऐतिहासिक नाण्याचे प्रदर्शन देखील भरविण्यात आलेले आहे. हा नाट्यप्रयोग गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, सांस्कृतिक मंत्री गोविंद गावडे तसेच झी मराठी वरील स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेतील गणोजी शिर्के फेम स्वप्नील राजशेखर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

मुलांवर संस्कार घडविण्यासाठी शिवसंस्कार चा जन्म - डॉ. सोनल लेले

आजची युवा पिढी आपला इतिहास विसरत चालली असून, चुकीच्या मार्गांवर जात आहे. आपल्याला स्वराज्य मिळावे यासाठी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महाराणा प्रताप, राणी लक्ष्मीबाई अशा वीरांनी तसेच इंग्रजांकडून स्वातंत्र्य मिळावे यासाठी अनेक स्वातंत्र्यवीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे.

त्यांचे बलिदान आपल्या कायम लक्षात राहवे, त्यांचा इतिहास आजच्या पिढीला समजावा यासाठी मातृभूमी शिक्षण संस्थेअंतर्गत शिवसंस्कार हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या अंतर्गत स्पर्धेच्या माध्यमातून महान व्यक्तींची ओळख लहान मुलांसह युवक, युवतींना करून देण्यासाठी विविध स्पर्धा आयोजित करण्याचा मानस आहे.

सद्य स्थितीत महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, गुजरात मध्ये संस्थेचे उपक्रम राबविले जात असून येत्या काळात भारतातील सर्वच राज्यात या संस्थेच्या माध्यमातून पोहचून देशप्रेमी पिढी घडविण्याचे आमचे प्रयत्न आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

गोव्यातील पोर्तुगीजकालीन पूलांचे होणार 'स्ट्रक्चरल ऑडिट'; सावंत सरकारचा निर्णय

Goa Government Schools: ...गेल्या 5 वर्षांत ट्रेंड बदलला, शासनाचे सरकारी शाळांना प्राधान्य; CM सावंत

Goa Today's News Live: गोव्यातील सर्व धर्मियांमध्ये संत फ्रान्सिस झेवियर यांचा DNA; मंत्री सिक्वेरा

SCROLL FOR NEXT