कोकणी भाशा मंडळ Dainik Gomantak
गोवा

'कोकणी भाषेच्या उत्कर्षासाठी संघटितपणे प्रयत्न'

अन्वेषा सिंगबाळ: कोकणी भाषा मंडळातर्फे वार्षिक पुरस्कारांचे वितरण

दैनिक गोमन्तक

सासष्टी: कोकणी भाषेच्या उत्कर्षासाठी संघटितपणे काम करण्याचा निर्धार मंडळाच्या अध्यक्ष अन्वेषा सिंगबाळ यांच्यासह उपस्थित वक्त्यांनी केला. मडगावच्या रवींद्र भवनात आयोजित कोकणी भाषा मंडळातर्फे 2021 सालच्या विविध पुरस्कारांचे वितरण सोहळ्यात सैल बोलत होते.

यावेळी अखिल भारतीय कोकणी परिषदेच्या अध्यक्ष उषा राणे, ज्येष्ठ साहित्यिक महाबळेश्‍वर सैल,कोकणी कार्यकर्ते सदानंद काणेकर, वेर्णा औद्योगिक संघटनेचे अध्यक्ष प्रदीप दा कॉस्ता, उद्योजक प्रकाश कापाडिया, दक्षिण गोवा अतिरिक्त जिल्हाधिकारी सुरेंद्र नायक आदी मान्यवर उपस्थित होते.

मंडळाच्या अध्यक्ष अन्वेषा सिंगबाळ म्हणाल्या की, कोकणीबद्दल जो जाहीरनामा राजकीय पक्ष, राज्यपाल, मंत्री, आमदार यांना सादर केला आहे. त्याची अंमलबजावणी करून घेण्यासाठी एक दबाव गट स्थापन केला जाईल.

मंडळाचे उपाध्यक्ष पोब्र फर्नांडीस यांनी स्वागत केले. वार्षिक पुरस्कार वितरणासह शालान्त व उच्च माध्यमिक स्तरावर कोकणीत सर्वाधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव, स्व. पद्मजा माणिकराव गावणेकर शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आला. विद्याभुवन कोकणी प्राथमिक शाळा तसेच रवींद्र केळेकर ज्ञानमंदिरच्या विद्यार्थी व शिक्षकांनी बहारदार संगीत तसेच नृत्य सादर केले. उषा राणे म्हणाल्या की, कोकणी भाषा मंडळाचे शैक्षणिक क्षेत्रातील काम उल्लेखनीय आहे.

शैक्षणिक पुरस्कार विजेते: दहावीत 100 टक्के गुण - पुरुषोत्तम उर्फ दीपतम राजेंद्र पै वैद्य (सर्वोदय एज्युकेशन सोसायटी हायस्कूल, कुडचडे), बारावीत 98 टक्के गुण - निशा रामनाथ पै ( मुष्टिफंड, कुजिरा), ब्लुमेना अमेलिया कुलासो (डॉन बॉस्को, पणजी), यशस्वी आनंद तुळसकर (सेंट झेवियर्स, म्हापसा), प्राजक्ता पांडुरंग घाडी (धेंपे उच्चमाध्यमिक, मिरामार), दीपाक्षा दयानंद गावकर (श्रीमती चंद्रभागा तुकोबा नाईक).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT