Mahadayi water dispute in Goa  Dainik Gomantak
गोवा

Mahadayi Water Dispute : म्हादईप्रश्नी तात्काळ एकदिवसीय विधानसभा अधिवेशन बोलवा; विरोधक आक्रमक

मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. मात्र, सगळे निर्णय ठरलेले असताना आम्हाला कशाला बोलावले? अशी टीका करत विरोधकांनी या बैठकीवर बहिष्कार टाकला.

आदित्य जोशी

म्हादईबाबत केंद्राने कर्नाटकच्या सुधारित सविस्तर प्रकल्प आराखड्याला दिलेल्या मंजुरीबाबत राज्य सरकारने काल सकाळी मंत्रिमंडळाची बैठक घेतली. यावेळी डीपीआर मागे घेण्याकरिता केंद्राला विनंती आणि 8 दिवसांत जल व्यवस्थापन प्राधिकरण स्थापन करावे, अशी मागणी करण्याचे ठरले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. मात्र, सगळे निर्णय ठरलेले असताना आम्हाला कशाला बोलावले? अशी टीका करत विरोधकांनी या बैठकीवर बहिष्कार टाकला. तसेच या प्रश्‍नी विधानसभेचे तत्काळ अधिवेशन घ्यावे, अशी जोरदार मागणी केली.

कळसा, भांडुराला वळविण्यासाठीच्या आराखड्याला मंजुरी दिल्याने राज्य सरकारने केंद्रावर दबाव टाकावा, यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. मात्र, तत्पूर्वी मंत्रिमंडळाची बैठक घेऊन सरकारतर्फे केल्या जाणाऱ्या प्रयत्नांची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. आवश्‍यकता भासल्यास आराखडा मागे घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री शहा, जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंग शेखावत यांना सर्वपक्षीय आमदारांसह भेटणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

जल आयोगाच्या निर्णयाला विरोध करत ही मंजुरी मागे घ्यावी आणि आठ दिवसांत जल व्यवस्थापन प्राधिकरण स्थापन करावे या मागणीसाठी विशेष प्रयत्न केले जातील. सध्या या भागांत कोणत्याही स्वरुपाचे बांधकाम सुरू नसून गेल्या अडीच वर्षांत कर्नाटकाकडून केवळ सर्वेक्षण राबवल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shravan 2025: श्रावण महिना सुरु होतोय, सर्व मनोकामना पूर्ण होतील! जाणून घ्या तिथी आणि शुभ योग कोणते?

Foreign Nationals Arrested: डिचोलीत बेकायदा वास्तव्य करणाऱ्या 2 परदेशी महिलांना अटक

Crime News: "तुझ्या पतीच्या स्पर्ममध्ये विष, माझ्यासोबत संबंध ठेव" पाद्रीचा उपचाराच्या नावाखाली लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न

Undertaker Viral Video: भारताचा अंडरटेकर! चिमुकल्या चाहत्याची एंट्री पाहून WWE प्रेमी थक्क, व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल, भारीच...

Vaibhav Sooryavanshi: रोहित, विराट, गावस्कर सोडा...'या' खेळाडूकडून मिळते वैभव सूर्यवंशीला जिद्द, चिकाटी आणि प्रेरणा; स्वतःच केला खुलासा

SCROLL FOR NEXT