Yuri Alemao  Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: सावंत सरकारला घेरण्यासाठी विरोधकांची रणनीती! विधानसभा संकुलातील विरोधी पक्षनेत्यांच्या बैठकीत खलबतं

Opposition Targets Government In Goa: सुमार कामगिरीवरून सरकारला घेरण्यासाठी विरोधकांनी विधानसभा अधिवेशनासाठी रणनीती निश्चित केली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: सुमार कामगिरीवरून सरकारला घेरण्यासाठी विरोधकांनी विधानसभा अधिवेशनासाठी रणनीती निश्चित केली आहे. विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांच्या विधानसभा संकुलातील कक्षात यासाठी विरोधी आमदारांनी एक बैठक घेतली. या बैठकीला आलेमाव यांच्यासह गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष तथा आमदार विजय सरदेसाई, आमदार एल्टन डिकॉस्ता, कार्लुस आल्मेदा, ‘आप’चे वेन्झी व्हिएगस उपस्थित होते.

‘आरजी’चे आमदार वीरेश बोरकर हे विरोधकांसोबत आहेत का, अशी विचारणा आलेमाव यांना करण्यात आली. कारण या बैठकीला ते उपस्थित नव्हते. त्यावर आलेमाव म्हणाले, सत्ताधारी किंवा विरोधक असे दोनच गट असतात. ते विरोधातच आहेत. विरोधात नसतील तर सत्ताधारी गटात असावे लागतील. कारण अन्य तिसरा गट नसतो.

आझाद मैदानावर अधिवेशन भरवा

विजय सरदेसाई (Vijai Sardesai) यांनी सांगितले की, केवळ दोनच दिवसांचे अधिवेशन घेण्याचा सरकारी निर्णय म्हणजे लोकशाहीची थट्टा आहे. मला वाटते, त्यात सहभागी होऊ नये; कारण आपण त्यात सहभागी होणे म्हणजे त्याला साथ देण्यासारखे आहे. मात्र, विरोधी पक्षाने सहभागी होण्याचे ठरविल्याने मीही सहभागी होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT