opposition meet the governor Dainik Gomantak
गोवा

Goa Assembly Winter Session : सभापतींच्या नकारानंतर विरोधकांनी घेतली राज्यपालांची भेट

माफी मागत नाही तोपर्यंत विरोधकांना भेट देणार नाही : रमेश तवडकर

Rajat Sawant

विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांच्या नेतृत्वाखालील विरोधी पक्षाच्या आमदारांनी गोव्याचे राज्यपाल पी.एस.श्रीधरन पिल्लई यांची भेट घेतली आणि त्यांना निवेदन सादर केले. या निवेदनात विधानसभेचे अधिवेशन आणि सभागृहाच्या कामकाजावरील निर्बंधांवरून विरोधी पक्षाच्या आमदारांमधील आणि सभापती यांच्यातील मतभेद दूर करण्यासाठी हस्तक्षेप करण्याची विनंती निवेदनात केली आहे.

आम्ही काही बाबी राज्यपालांमोर ठेवल्या आहेत. त्या राज्यपालांना पटल्या असल्याने राज्यपाल त्यांच्याशी फोनवर संवाद साधून मार्ग काढतील असा विश्वास विरोधी आमदार विजय सरदेसाई यांनी व्यक्त केला.

सात विरोधी आमदारांची सोमवारी विधानसभवनात बैठक पार पडली. त्या बैठकीनंतर त्यांनी मला भेटण्यासाठी परवानगी मागितली, ती भेटही आपण मान्य केली. परंतु त्यांच्या बैठकीनंतर प्रसार माध्यम प्रतिनिधींकडे प्रतिक्रिया देताना आमदार विजय सरदेसाई यांनी आपल्यावर टीका केली. त्यांनी आपल्याला मुख्यमंत्र्यांचा कर्मचारी असल्यागत मी वागत असल्याचा आरोप केला होता. त्यामुळे हे वक्तव्य करून सरदेसाई यांनी सभापतीच्या खुर्चीचा अवमान केला आहे. विरोधी आमदार विजय सरदेसाई यांनी आपल्याविषयी केलेल्या विधानाबाबत जाहीर माफी मागावी. जोपर्यंत ते माफी मागत नाहीत, तोपर्यंत विरोधकांना भेट देणार नाही, असा पवित्रा सभापती रमेश तवडकर यांनी घेतला.

युरी आलेमाव म्हणाले, राज्यात लोकशाहीचा खून झाला आहे. विरोधी आमदारांची भूमिका मांडण्यासाठी ही व्यासपीठ असते, विधानसभा कामकाजाचा कालावधी कमी करून हक्क हिरावून घेण्याचा हा प्रयत्न आहे. सभापती हे सभागृहाचे कस्टोडियन असतात. त्यांनी आमचे म्हणणे ऐकून घ्यायला हवे, त्यांनी आमची भेट नाकारली असल्याने विरोधी सात आमदारांनी राज्यपालांना निवेदन दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Scam करणाऱ्यांचा प्लॅन होईल फेल! WhatsAppची 'ही' सेटिंग ON करा, संशयास्पद मेसेजपासून आधीच मिळेल सावधानतेचा इशारा

बॉल की बुलेट...! पोलार्डला टाकला खतरनाक बाउन्सर, चेंडू थेट सीमारेषेपार; विकेटकीपर बघतच राहिला Watch Video

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; निलंबनाची याचिका फेटाळली, ECI आणि कायदे मंत्रालयाला नोटीस!

ICC Fine India West Indies: T20 मालिकेपूर्वी भारत-वेस्ट इंडिजला 'आयसीसी'चा दणका; दोन्ही संघांना ठोठावला दंड, कारण काय?

Viral Video: देवदूत बनून आला 'कॉन्स्टेबल'! चालत्या ट्रेनमध्ये चढताना प्रवाशाचा गेला तोल अन्... जीवघेण्या अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

SCROLL FOR NEXT