Sadanand Shet Tanawade Dainik gomantak
गोवा

'सांताक्रूझमध्ये इतिहास घडवण्याची संधी'

सांताक्रूझ मतदारसंघात आजवर भाजपचा उमेदवार यापूर्वी जिंकलेला नाही; सदानंद तानावडे

दैनिक गोमन्तक

पणजी : भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट-तानावडे यांनी आज सांताक्रूझ मतदारसंघाचा दौरा केला. या मतदासंघातील मेरशी पंचायत क्षेत्रातील प्रभाग क्रमांक 8, 17, 18 आणि 23 मधी घरांना त्यांनी भेट दिली.

यावेळी गोवा भाजपचे प्रभारी सी टी रवी, उमेदवार टोनी फर्नांडिस, केशव प्रभू, लवू होबळे, सुनिल कळगुटकर, दामोदर केरकर, संदेश शिरोडकर, जिल्हा पंचायत सदस्य गिरीश उस्कईकर, जयेश वेंगुर्लेकर, संदेश कुंकळकर, कृतीका वायांगणकर, तुलसीदास मडकईकर, प्रमोद कामत आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी प्रभाग क्रमांक 17 मध्ये लतिका वेंगुर्लेकर यांच्या निवासस्थानी महिला कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी बोलताना तानावडे म्हणाले, सांताक्रूझ मतदारसंघात आजवर भाजपचा उमेदवार यापूर्वी जिंकलेला नाही. पण यावेळी आपल्याला ही परंपरा मोडीत काढायची आहे. या मतदारसंघातील भाजपचा महिला मोर्चा आणि येथील स्वयं साहाय्य गट ही भाजपची ताकद आहे. ही ताकद वापरून यावेळी या मतदारसंघात आपल्याला इतिहास (History) घडवण्याची संधी मिळाली आहे. गेल्यावेळी भाजपाच्या उमेदवाराचा केवळ 500 मतांनी पराभव झाला होता. यावेळी तो फरक भरून तर काढायचा आहेच.

शिवाय प्रचंड मतांनी भाजपाच्या (BJP) उमेदवारास निवडून द्यायचे आहे, असे आवाहन त्यांनी केले. पुढे बोलताना ते म्हणाले, नवमतदार महत्त्वाचे आहेत. भाजपाने केलेला विकास आणि रोजगाराची आणि नोकऱ्यांची उपलब्ध करून दिलेली संधी याची माहिती तरुणांपर्यंत पोहोचवा. तरुणांनी भाजपाच्या पाठीशी उभे राहावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. यासाठी पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी विशेषतः महिला वर्गाने पुढाकार घ्यावा. केवळ आपल्या कुटुंबाचेच नव्हे तर तुमचे शेजारी नातेवाईक आणि परिचयाच्या सर्व मतदारांनी भाजपाला मत द्यावे यासाठी झटावे. या मतदारसंघात अनेक विकासकामे पूर्ण केली आहेत. उर्वरित कामे आगामी काळात पूर्ण केली जातील, असे आश्वासन सदानंद तानावडे (Sadanand Tanawade) यांनी दिले.

लतिका वेंगुर्लेकर यांनी सर्वांचे आभार मानले. तत्पूर्वी मतदारसंघात आयोजित घरोघरी प्रचार मोहिमेस उत्तम प्रतिसाद लाभला. यावेळी पक्षाचे कार्यकर्ते विशेषतः तरुण आणि महिलांचा उत्स्फूर्त सहभाग होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

NSA In Goa: गुन्हेगारी कृत्यांवर वचक ठेवण्यासाठी गोवा सरकारने उचलले मोठे पाऊल, राज्यात राष्ट्रीय सुरक्षा कायदा लागू

Goa Today's News Live: 8.50 कोटी रुपयांची थकबाकी; मुरगाव पालिकेची इंडियन ऑईला कारणे दाखवा नोटीस

Goa Politics: खरी कुजबुज; युतीचा आवेश संपला का?

बोहल्यावर चढण्यापूर्वीच काळाने गाठले, परदेशातून लग्नासाठी गोव्यात आलेल्या ‘लिओ’चा अपघाती मृत्यू

VIDEO: "वेळीच सुधारणा केली नाही तर..." चौथ्या टी-20 सामन्यापूर्वी गौतमचा शुभमन गिलला 'गंभीर' इशारा! सरावादरम्यानचा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT