Goa Transport Minister Mauvin Godinho Dainik Gomantak
गोवा

Dabolim Flyover: 'या' उड्डाण पुलामुळे वाहतूक सुरळीत होणार; मंत्री गुदिन्होंनी केले अफवांवर विश्‍वास न ठेवण्याचे आवाहन

Mauvin Godinho: ८०० कोटी रुपये खर्चाच्या या उड्डाण पुलामुळे वाहतूक सुरळीतपणे होण्यास मोठी मदत होणार असल्याचे पंचायत मंत्री मावीन गुदिन्हो यांनी सांगितले.

गोमन्तक डिजिटल टीम

Flyover between Verna and Dabolim for smoother traffic flow

वास्को: वेर्णा ते दाबोळी दरम्यानच्या उड्डाण पुलासंबंधी काही विरोधक अडथळे आणीत आहेत, सदर उड्डाण पुलाची गरज नसल्याचे ते सांगतात. तथापि ८०० कोटी रुपये खर्चाच्या या उड्डाण पुलामुळे वाहतूक सुरळीतपणे होण्यास मोठी मदत होणार असल्याचे पंचायत मंत्री मावीन गुदिन्हो यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, विरोधकांच्या नकारात्मक अफवांवर जनतेने विश्र्वास ठेवू नये. गोवा मुक्तिदिनानिमित्त दाबोळीच्या जॉगर्स पार्क परिसरात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते.

यावेळी आमदार संकल्प आमोणकर, आमदार कृष्णा साळकर, नगराध्यक्ष गिरिष बोरकर, चिखलीचे सरपंच कमलाप्रसाद यादव, उपसरपंच ऐश्वर्या कोरगावकर, बोगमाळोचे सरपंच संकल्प महाले, उपसरपंच लॉरेना डिकुन्हा, जिल्हा पंचायत सदस्य अनिता थोरात, पालिका मुख्याधिकारी दीपेश प्रियोळकर, उपजिल्हाधिकारी भगवंत करमली, मामलेदार प्रवीणजय पंडित, संयुक्त मामलेदार ब्रजेश तिरोडकर, पोलिस उपअधीक्षक गुरुदास कदम तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

दोन्ही विमानतळ हवे!

पर्यटकांच्या सोयीसाठी तसेच शाश्वत अर्थव्यवस्थेसाठी गोव्यातील मोपा व दाबोळी विमानतळांची गरज आहे. तथापि काहीजण दाबोळी विमानतळाबद्दल अफवा पसरवत आहेत. ते समाज माध्यमातून नकारात्मक गोष्टी पसरवीत आहेत. त्यामुळे चांगले काय व वाईट काय? यासंबंधी लोकांचा गोंधळ उडतो. पण त्याकडे लक्ष देऊ नये, असे गुदिन्हो म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Codar IIT Project: ‘गोवा विकायला काढलाय’! आयआयटी आंदोलनात काँग्रेसची उडी; विरियातो उठवणार संसदेत आवाज

Goa Live Updates: कोंकणी प्रजेचो आवाज हरपला! बाबली नायक यांचे निधन

Adivasi Bhavan: आदिवासी भवनाचे काम 2 महिन्‍यांत सुरू करणार! तवडकरांची हमी; GSIDC कडून प्रक्रिया सुरू

Goa Politics: खरी कुजबुज; व्‍हेंझींना ‘त्‍या’ महिलेचा कळवळा नाही का?

ESG: गोवा मनोरंजन संस्थेचा नवीन गोंधळ! गाजलेल्या ‘जुझे’ फिल्मच्या टीमकडून पुरस्कार परत; वादग्रस्त अहवाल हटवला

SCROLL FOR NEXT