Mayem Goa Crime  Dainik Gomantak
गोवा

'टीव्ही बघत होतो, कुत्रा भुंकायला लागला म्हणून खिडकीत आलो तोवर...'; गोव्यात 65 वर्षांच्या वृद्धावर गोळीबार

गोळी लागलेली असताना जखमी अवस्थेत कोण आरोपी आहेत हे ते पाहण्यासाठी बाहेर गेले.

Pramod Yadav

गोव्यातील मये येथून एक धक्कादायक आणि विचित्र घटना समोर आली आहे. 65 वर्षीय वृद्ध आपल्या पत्नीसोबत घरात टीव्ही पाहत असताना त्यांना घराच्या बाहेर वेगळा आवाज ऐकू आला, त्यात त्यांचा कुत्रा देखील भुंकायला लागला. आवजाची शाहनिशा करण्यासाठी वृद्धाने खिडकीचे दार उघडले आणि त्यांच्यासोबत जीवावर बेतणारा प्रसंग घडला.

याबाबत त्यांनी पोलिसांत तक्रार देखील दाखल केली असून, या तक्रारारीत त्यांनी त्यांच्यावर बेतलेल्या प्रसंगाची माहिती दिली आहे.

गेल्या गुरूवारी अजित शिवराम म्हांब्रे, आपली पत्नी आणि मुलीसोबत घरात टीव्ही पाहत बसले होते. दरम्यान, त्यांच्या घराबाहेर असणारा कुत्रा जोर जोरात भुंकायला लागला. कुत्रा का भुंकत आहे हे पाहण्यासाठी अजित यांनी शाहनिशा करण्याचे ठरवले. त्यांनी उठून खिडकीचे दार उघडले. आणि बंदुकीचा मोठा आवज झाला. बंदुकीतून सुटलेली गोळी म्हांब्रे यांच्या पोटात घुसली होती. आणि त्यातून रक्तस्त्राव व्हायला लागला होता.

म्हांब्रे गोळी लागलेली असताना जखमी अवस्थेत कोण आरोपी आहेत हे पाण्यासाठी बाहेर गेले. घराबाहेर दोन व्यक्ती होते, त्यापैकी एक मांद्रेकर असल्याचे म्हांब्रे यांना समजले. विशेष म्हणजे म्हांब्रे यांनी त्यांच्यावर गोळीबार झाला असून, झालेली जखम ते मांद्रेकर यांनाच दाखवत होते. दरम्यान, त्यानंतर तो पळून गेला असे म्हांब्रे यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीत म्हटले आहे.

हा चित्तथरारक प्रसंग घटल्यानंतर घटनास्थळी रूग्णवाहिका पोहचण्यासाठी काही वेळ लागला. दरम्यान, खासगी वाहनातून म्हांब्रे गोमेकॉत दाखल झाले. रूग्णालयात डॉक्टरांनी म्हांब्रे यांच्यावर शस्त्रक्रिया करून, बंदुकीची गोळी बाहेर काढली.

याप्रकरणी डिचोली पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम 336, 338 आणि आर्म अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाल्याप्रमाणे डिचोली पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. दोघानांही न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपींकडून शस्त्र जप्त करण्यात आले आहे.

दरम्यान, अनंत शिवदास मांद्रेकर यास दहा हजार रूपयांच्या मुचलक्यावर न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. तथापि, त्याला चौकशीसाठी तीन दिवस दुपारी अडीच ते पाच या वेळेत पोलिसांत हजेरी लावण्यास सांगण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa High Court: हॉटेल एफएआर घोटाळा: 2 आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करा, अन्यथा मुख्य नगरनियोजकांना कोर्टात हजर राहावे लागेल

Goa Rough sea: बेतुल येथील फ्लोटिंग जेटी कोसळली; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, धोकादायक जेटी हटवण्याची मागणी

Meta AI Smart Glass: तुमची प्रत्येक हालचाल, प्रत्येक संवाद एआयच्या नजरेत? मेटा आणतंय 'सुपर-सेन्सिंग' चष्मा, पाहणाऱ्या-ऐकणाऱ्या गॅझेटमुळे गोपनीयतेवर प्रश्नचिन्ह

Goa Hotel Death: फातोर्ड्यात खळबळ! नोएडातील व्यावसायिकाचा हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू, पुढील तपास सुरू

Goa crime: एडिसन सोरंग खूनप्रकरणी दोघांना जन्मठेप; किरकोळ वादाचे हत्येत रुपांतर, फावड्याने वार करून मित्राला संपविले

SCROLL FOR NEXT