Sand Mining | Goa News Dainik Gomantak
गोवा

Goa Sand Mafia: शिरोडा-पंचवाडी परिसरात खुलेआम रेती उत्खनाचा 'रात्रीस खेळ चाले'

उच्च न्यायालयाचा आदेश धाब्यावर

दैनिक गोमंतक

Goa Sand Mafia: मुंबई उच्च न्यायालयाने बेकायदेशीररित्या केले जाणारे रेती उत्खनन बंद करा, असा आदेश दिला असला तरी हा आदेश धाब्यावर बसवून शिरोडा आणि दिगास-पंचवाडी या भागात रेती उत्खनन खुलेआम सुरू आहे. 60 ट्रकमधून रात्री हा सर्व रेती उत्खनन आणि वहनाचा खेळ चालत असल्याचे समोर आले आहे.

या गोष्टीकडे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले असून पोलिसही काहीच माहीत नाही, अशा आविर्भावात आहेत. कुडतरीनजीक झुवारी नदीत सक्शन पंपद्वारे ही रेती काढली जाते आणि नंतर होड्यांतून पंचवाडी येथे दिगाशेर आणि शिमेर या भागात आणून ठेवली जाते.

हा सर्व खेळ रात्रीच्या काळोखात सुरू असतो. रात्रीच ही रेती ट्रकमध्ये भरून त्याची वाहतूक केली जाते. रात्री 12 ते पहाटे 5 वाजेपर्यंत हा खेळ सुरू असतो. पहाटे 5 च्या ठोक्याला हे गोरखधंदे बंद केले जातात.

60 ट्रकांचा ‘रात्रीस खेळ चाले’

पंचवाडी येथून ही रेती भरून आणण्यासाठी दररोज किमान 60 ट्रक वापरले जातात. रात्रभर ही वाहतूक सुरू असते. या ट्रकच्या घरघरीमुळे लोकांच्या झोपेचे खोबरे होत आहे, अशी तक्रार स्थानिकांतून होत आहे. पूर्वी हे उत्खनन सावर्डे-कुडचडे भागात मोठ्या प्रमाणात सुरू होते.

मात्र, मागच्या वर्षी या व्यवसायाच्या वैमनस्यातून कुडचडेत एक खून झाल्यावर कुडचडे पोलिस स्थानकाच्या हद्दीत सुरू असलेले उत्खनन पूर्णपणे बंद करण्यात आले. या हद्दीला लागून असलेल्या भागात ते अजूनही सुरू असून पोलिस आणखी काही दुर्घटना घडण्याची वाट पाहात आहेत का, असा सवाल लोक करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ट्रेनच्या खिडकीतून बाहेर लटकणारे पाय अन्...'; चिमुकलीच्या व्हिडिओनं खळबळ; सोशल मीडियावर थरकाप व्हायरल

Sanjay Dutt Luxury Hotel In Goa: संजय दत्तचं गोव्यात आलिशान लक्झरी हॉटेल, उद्घाटनापूर्वीच रचला इतिहास; आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरतंय चर्चेचा विषय

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT