Goa Crime News Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: दक्षिण गोव्‍यात 'मटका खुलेआम', केवळ ३१८ प्रकरणांची नोंद; 'कडक कारवाई'च्या आदेशाला वाटाण्‍याच्‍या अक्षता

Goa Crime News: आठवडी बाजार, बसस्‍थानके, बाजारपेठा एवढेच नव्‍हे तर चक्‍क पोलिस स्‍थानकाच्‍या समोरही दक्षिण गोव्‍यात काही ठिकाणी मटका घेतला जातो

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Gambling Racket

मडगाव: आठवडी बाजार, बसस्‍थानके, बाजारपेठा एवढेच नव्‍हे तर चक्‍क पोलिस स्‍थानकाच्‍या समोरही दक्षिण गोव्‍यात काही ठिकाणी मटका घेतला जातो. मात्र जानेवारी ते जुलै या सात महिन्‍यांत दक्षिण गोव्‍यात मटक्‍याची फक्‍त ३१८ प्रकरणेच नोंद झालेली आहेत. मटका जुगारावरील पोलिसांची कारवाई फक्‍त तोंडाला पाने पुसण्‍यापुरतीच असते, हे पुन्‍हा एकदा स्‍पष्‍ट झाले आहे.

गोव्‍यात खुलेआम मटका घेत असल्‍याचा आरोप करून उच्‍च न्‍यायालयात याचिका दाखल करण्‍यात आली होती. त्‍यानंतर न्‍यायालयाने पोलिसांना फटकारत ‘या जुगारावर कडक कारवाई करा’, असा आदेश दिला होता. मात्र या आदेशाला पोलिसांनी वाटाण्‍याच्‍या अक्षता लावल्‍याचे स्‍पष्‍ट झाले आहे.

असे जरी असले तरी मागच्‍या वर्षाच्‍या तुलनेत यंदा गुन्‍हे नोंद होण्‍याचे प्रमाण काही प्रमाणात वाढले आहे. २०२३ साली जानेवारी ते डिसेंबर या बारा महिन्‍यांत फक्‍त २७२ प्रकरणांचीच नोंद झाली होती.

मडगाव हे अत्‍यंत गजबजलेले शहर असून या शहरात इतर उलाढालींबरोबरच मटक्‍याचीही उलाढाल मोठ्या प्रमाणात होत आहे. मात्र जानेवारी ते जुलै या कालावधीत मडगावात फक्‍त २८ प्रकरणे नोंद झाली आहेत. त्‍यामानाने फोंडा पोलिस स्‍थानकाच्‍या कक्षेत अशा ३० प्रकरणांची नोंद झाली आहे.

पोलिस स्‍थानके आणि प्रकरणे

अन्‍य पोलिस स्‍थानकाच्‍या कक्षेत पहिल्‍या सात महिन्‍यांत नोंद झालेल्‍या मटक्‍याची प्रकरणे पुढीलप्रमाणे आहेत. सांगे : २७, कुडचडे व म्‍हार्दोळ : २६ (प्रत्‍येकी), कुंकळ्‍ळी व फातोर्डा : २४ (प्रत्‍येकी), केपे : २३, कोलवा : २२, वास्‍को : २१, मायणा-कुडतरी व काणकोण : २० (प्रत्‍येकी), वेर्णा : १२, मुरगाव व कुळे : ६ (प्रत्‍येकी).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT