online Education in Goa Dainik Gomantak
गोवा

Goa: Online Educationच्या जमान्यातही फक्त 8 टक्के शाळांत इंटरनेट

राज्यातील सरकारी शाळा (Government School) आणि अनुदानित व खासगी शाळातील सुविधा यांच्यात जमीन आस्मानाचा फरक आहे अशी माहिती पुढे आली आहे.

दैनिक गोमन्तक

मडगाव: कोविड महामारीच्या (Covid 19) आगमनानंतर ऑनलाइन शिक्षण (Online Education) हा परवलीचा शब्द झालेला असताना गोव्यात फक्त 8 टक्के सरकारी शाळातच इंटरनेटची सेवा उपलब्द असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. शिक्षणासंबंधी समग्र जिल्हा माहिती यंत्रणे ( Unified district information system for education) च्या 2019-20 च्या अहवालातून ही माहिती पुढे आली आहे. गोव्यात एकूण 827 सरकारी शाळा असून त्यापैकी फक्त 8.5 टक्के म्हणजे 70 शाळातच इंटरनेटची सेवा उपलब्ध आहे. (Only 8 Per Cent of schools in Goa have internet, In the age of online education)

ही सरासरी राष्ट्रीय स्तरापेक्षा कमी असून राष्ट्रीय स्तरावर हे प्रमाण 11.5 टक्के एव्हढे आहे. केरळ आणि दिल्ली राज्यात हेच प्रमाण जवळपास 85 टक्के एव्हढे आहे. गोव्यात 750 पेक्षा जास्त सरकारी शाळात इंटरनेटची सोय नसून त्यात मोठ्या प्रमाणावर प्राथमिक स्तरावरील शाळांचा समावेश आहे.

राज्यातील सरकारी शाळा आणि अनुदानित व खासगी शाळातील सुविधा यांच्यात जमीन आस्मानाचा फरक आहे अशी माहिती पुढे आली आहे. गोव्यातील 517 अनुदानित शाळांपैकी 395 शाळात (76.4%) तर 138 खासगी शाळांपैकी 110 शाळात (79.7%) शाळांमध्ये इंटरनेट सेवा असून राज्यातील अनुदानित आणि खासगी शाळात उपलब्द असलेल्या सेवाबाबत मात्र गोव्याचा नंबर पहिल्या 6 राज्यात लागत आहे.

संगणकांच्या उपलब्धी बाबतही गोव्यातील सरकारी शाळा राष्ट्रीय स्तरापेक्षा बऱ्याच खाली असून देशातील राष्ट्रीय सरासरी 28.5 टक्के असताना गोव्यातील फक्त 17.6 टक्के शाळांकडेच संगणक आहेत. गोव्यात अनुदानीत शाळांमध्ये 90 टक्के तर खासगी शाळात हेच 93. 5 टक्के असे प्रचंड आहे.मात्र पायाभूत सुविधांचा विचार केल्यास गोव्यात 100 टक्के शाळात वीज, पाणी, सौचालये, मुलींसाठी वेगळी सौचालये या सोयी असून गोव्यातील सुमारे 1500 शाळांमध्ये स्वतःचे वाचनालय आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

SCROLL FOR NEXT