Job
Job  Dainik Gomantak
गोवा

Job Opportunities In Goa: ‘आयपीबी’कडून केवळ 55 गोमंतकीयांना नोकरी - काँग्रेसचा गौप्यस्फोट

गोमन्तक डिजिटल टीम

Job Opportunities In Goa राज्यातील भाजप सरकारसाठी गुंतवणूक प्रोत्साहन मंडळ (आयपीबी) ही पैसा कमावणारी यंत्रणा ठरली आहे. आयपीबीअंतर्गत मंजूर झालेल्या प्रकल्पांबद्दल आणि रोजगार निर्मितीबद्दल वारंवार मोठे दावे सरकार करीत असले तरी ते फोल ठरले आहेत.

आयपीबीतील ८ हजार ७३ रोजगारांपैकी केवळ ५५ गोमंतकीयांना विविध प्रकल्पांमध्ये रोजगार मिळाल्याचा गौप्यस्फोट काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी केला आहे.

काँग्रेस भवनात गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेस कॅ. विरिएतो फर्नांडिस, माध्यम विभागप्रमुख अमरनाथ पणजीकर आणि मोरेन रिबेलो उपस्थित होते. पाटकर म्हणाले की, केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारांच्या जुमला मालिकेतील आणखी एक जुमला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाच्या नव्या उद्योगांची व रोजगार संधीची आकडेवारी जाहीर करून जनतेसमोर आणला आहे.

उद्योगमंत्री माविन गुदिन्हो यांनी २१ जुलै २०२२ रोजी विधानसभेच्या प्रश्न क्र.३२ ला उत्तर देताना आयपीबीकडून २२८ प्रकल्पांना (१६ हजार ८७४.३२ कोटींची गुंतवणूक) मंजुरी दिली होती. त्यापैकी २०१४ पासून २०२२ पर्यंत ७६ प्रकल्प पूर्ण कार्यान्वित आहेत, असे नमूद केले आहे.

याच उत्तराच्या परिशिष्टात, उद्योगमंत्र्यांनी या प्रकल्पांतून प्रस्तावित ४१ हजार ६२७ पैकी प्रत्यक्षातील रोजगार संख्या ८ हजार ७३ (१९.३ टक्के) असल्याचे व यापैकी फक्त ५५ गोमंतकीयांना रोजगार मिळाल्याचे नमूद केले आहे.

१९ जानेवारी २०२३ रोजीच्या विधानसभेतील प्रश्न क्र. ‘६-सी’ला दिलेल्या उत्तरात सरकारने गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाने २०२१ च्या सुरुवातीपासून राज्य आणि राज्याबाहेरील कर्मचाऱ्यांच्या रोजगाराची माहिती गोळा करण्यास सुरुवात केल्याचे म्हटले आहे.

गोवा आयडीसी भूखंड वाटपात घोटाळा झाला आहे. त्यामुळेच आयडीसीचे अध्यक्ष आलेक्स रेजिनाल्ड गप्प आहेत. राज्यातील युवकांना नोकऱ्या दिल्या जात नाहीत, परंतु कमिशन घेऊन बाहेरील लोकांना भूखंड विकले जात असल्याचा आरोप कॅ. फर्नांडिस यांनी केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Loksabha Voting: गोव्यातील अनेक चर्चमधून भाजपला मतदान न करण्याचे आवाहन; माजी मंत्र्याचा गंभीर आरोप

Goa Today's Live News: गोव्यात सकाळी नऊपर्यंत 13.02 टक्के मतदान

स्वतःच्या मालकीचा शॅक दुसऱ्याला दिल्याने HC ने 'जीसीझेडएमए’ला नोटीस बजावण्याचे दिले आदेश

Lok Sabha Election 2024: ''लोकसभा निवडणुकीनंतर ओबीसींच्या प्रलंबित मागण्या मार्गी लावणार''; CM सावंत यांची ग्वाही

Lok Sabha Election 2024: तिसवाडीत एक लाख मतदार बजावणार मतदानाचा हक्क; खिस्ती मते ठरणार निर्णायक

SCROLL FOR NEXT