Goa Police Dainik Gomantak
गोवा

Goa Police: पणजीत महिला पोलिस स्टेशनमध्ये केवळ 1 अधिकारी; 2 महिला अधिकारी दीर्घ रजेवर

तपासावर परिणाम

Akshay Nirmale

Goa Women Police Station: गोव्याची राजधानी पणजीत महिलांविषयक गुन्ह्यांच्या तपासासाठी स्वतंत्र महिला पोलिस स्थानक उभारले गेले आहे. तथापि, या स्थानकाचा कारभार आता केवळ एकाच अधिकाऱ्याकडे आहे. वाढत्या गुन्ह्यांमुळे तपासावर परिणाम होत असल्याचे सांगितले जात आहे.

या स्थानकाकडून महिला आणि बालकांबाबतच्या गुन्हेगारीच्या प्रकरणांचा तपास केला जातो. सध्या या स्थानकात केवळ एक महिला पोलिस निरीक्षक (एलपीआय) आहे.

या पोलिस ठाण्यात दोन महिला पोलिस उपनिरीक्षक मंजूर आहेत, मात्र दोघीही दीर्घ रजेवर आहेत. जवळपास एक महिन्यापासून त्या रजेवर आहेत, त्यामुळे या पोलिस ठाण्याचा कार्यभार केवळ एकमेव LPI वर आहे.

तपास आणि नवीन गुन्ह्यांची नोंद पाहता कमी कर्मचारी-अधिकाऱ्यांच्या संख्येमुळे तपासाला विलंब लागत असल्याचे सांगितले जात आहे. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबतचे वृत्त दिले आहे.

महिला पोलिस स्टेशनच्या मडगाव सेल आहे मानवी तस्करीच्या प्रकरणांशिवाय बलात्कार आणि इतर लैंगिक गुन्ह्यांची नोंद केली जात नाही.

राज्यातील महिला आणि बालकांशी संबंधित गुन्हे प्रकरणांचा तपास करण्याच्या उद्देशाने महिला पोलिस स्टेशनची स्थापना करण्यात आली होती. महिला पोलिस स्टेशन बलात्कार, कौटुंबिक हिंसाचार, लैंगिक शोषण आणि शाब्दिक अत्याचार यासह इतर प्रकरणांचा तपास करते.

सध्या केवळ एकच एलपीआय असल्याने हे पोलिस ठाणे केवळ घरगुती हिंसाचाराच्या प्रकरणांसाठी एक समुपदेशन केंद्र बनले आहे.

कारण येथे तपासासाठी कोणीही नाही. घरगुती हिंसाचाराच्या प्रकरणात हेड कॉन्स्टेबल किंवा कॉन्स्टेबल पती-पत्नी दोघांनाही कॉल करतात आणि त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांना सल्ला देतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: 'कॅश फॉर जॉब प्रकरण'; काँग्रेस युथ पदाधिकाऱ्यांची म्हार्दोळ पोलिस स्थानकावर धडक!

IFFI 2024: गोमंतकीय फिल्ममेकर्ससाठी खुशखबर! कलाकार, निर्मात्‍यांसाठी विशेष मास्टर्स क्लास; दिलायला यांची माहिती

IFFI 2024: सिनेविश्वातील महिलांच्या सुरक्षेबाबत भूमी पेडणेकरचे मार्मिक विधान, 'पॉवर प्ले आहे पण..'

Pooja Naik Case: कोट्यवधीची फसवणूक करणाऱ्या 'कॅश फॉर जॉब' प्रकरणातील मास्टरमाईंड पूजा नाईकला जामीन मंजूर

Goa Crime: दोन सह्या करुन विवाह उरकला, काही दिवसातच नवदेवाने विचार बदलला; लैंगिक अत्याचारप्रकरणी फोंड्यातील तरुणाला अटक

SCROLL FOR NEXT