Online lottery gambling exposed in Vasco  Dainik Gomantak
गोवा

वास्कोत ऑनलाईन लॉटरी जुगाराचा पर्दाफाश

वास्को येथे ऑनलाईन लॉटरी चालणावणाऱ्या टोळीला पोलीस खात्याच्या गुन्हे अन्वेषण शाखेने रंगेहात पकडले.

दैनिक गोमन्तक

वास्को येथे ऑनलाईन लॉटरी चालणावणाऱ्या टोळीला पोलीस खात्याच्या गुन्हे अन्वेषण शाखेने रंगेहात पकडले. सदर घटना आज मध्यरात्री घडली जेव्‍हा गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने सुमारे 1.48 वा. सिने वास्कोच्या समोर असलेल्या दुकानावर धाड टाकली.

यात शाखेच्या पथकाला ऑनलाईन लॉटरी चालवणारे दोन संशयित आरोपी, तसेच त्यासाठी वापरण्यात येणारा कॉम्पुटर आणि 35 हजार रुपये रोख रक्कम सापडला. प्रकरणात संशयित आरोपी राधेश्‍याम चौहान (51, वास्को) आणि अनविंद चौहान (21, वास्को) याना अटक करून जामिनावर सोडण्यात आले आहे. प्रकरणाचा तपास गुन्हे अन्वेषण शाखेचे उपनिरीक्षक गिरीश पाडलोस्कर करत आहे, अशी माहिती पोलीस खात्याने दिली.

दरम्यान, सायबर क्राईम कक्षाने जुने गोवे येथील सनशाईन स्कूलजवळ एका बंगल्यामध्ये सुरू असलेल्या बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला. या कारवाईत या सेंटरचा प्रमुख सूत्रधार महम्मद रामीज एम. घान्ची ऊर्फ रॉय फर्नांडिस (32, गुजरात) याच्यासह इतर 8 पुरुष व 8 महिला कर्मचारी मिळून 16 जणांना अटक केली. तसेच 14 लॅपटॉप, 8 मोबाईल तसेच इतर साहित्य जप्त केल्याची माहिती पोलिस निरीक्षक राहुल परब यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

25 जणांचा मृत्यू झालेल्या ‘बर्च’ला परवानगी केवळ सरपंचांचा निर्णय नाही! वकिलांचा युक्तिवाद; अटकपूर्व जामिनावर होणार सुनावणी

Goa Farmers Policy: ‘शेतकरी’ची व्याख्या बदलणार! विपणन मंडळाचा कारभार कृषी खात्‍याकडे; हिवाळी अधिवेशनात विधेयक होणार सादर

Goa Politics: खरी कुजबुज; पालेकरांकडे भाजपचाही पर्याय?

Goa politics: युती न केल्‍यानेच ‘आप’ला निवडणुकीत फटका! पालेकरांचा दावा; सांताक्रूजमधील मतदारांना विश्‍‍वासात घेऊन निवडणार पर्याय

Bordem: 'हा आमच्या जीवाशी खेळ'! बोर्डे-डिचोलीत गटारात टाकली जलवाहिनी; संतप्त नागरिकांनी काम पाडले बंद Video

SCROLL FOR NEXT