Michael Lobo Dainik Gomantak
गोवा

गोवा काँग्रेसच्या बैठकीतून एक आमदार गायब, राष्ट्रपती निवडणुकीपूर्वी मोठा झटका?

गोवा काँग्रेसला मोठा झटका बसला आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Congress Meeting: गोवा काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. गोवा काँग्रेसच्या बैठकीला एक आमदार गैरहजर होता. गोव्यात काँग्रेसचे 11 आमदार आहेत. मात्र, सभेला केवळ 10 आमदारच पोहोचले. ज्येष्ठ नेते मुकुल वासनिक यांच्या अध्यक्षतेखाली गोवा काँग्रेसची बैठक पार पडली. माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्याशिवाय मायकल लोबो यांच्यासह काँग्रेसचे इतर सर्व आमदार सोमवारी रात्री झालेल्या पक्षाच्या बैठकीत सहभागी झाले होते. गोवा काँग्रेसची ही बैठक दोन तासांहून अधिक काळ चालली. गोवा काँग्रेसच्या या बैठकीला गोव्याचे प्रभारी दिनेश गुंडू राव आणि प्रदेशाध्यक्ष अमित पाटकरही उपस्थित होते.

काँग्रेसमध्ये फूट पाडल्याचा आरोप

मुकुल वासनिक यांनी मात्र असा दावा केला की, "चुकीच्या हेतूने" काही लोक गोव्यातील काँग्रेस युनिटमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, आमदारांच्या एकजुटीमुळे हा प्रयत्न फसला.'' विधानसभेत पूर्ण जोमाने काम करण्यासाठी आणि गोव्यात पक्ष मजबूत करण्यासाठी आमदारांशी बैठकीत चर्चा करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

आमदारांशी संपर्क नसल्याचा मुद्दा चुकीचा ठरला

विशेष म्हणजे, रविवारी दिगंबर कामत (Digambar Kamat) आणि मायकल लोबो (Michael Lobo) यांच्यासह 5 काँग्रेस आमदारांशी संपर्क होऊ शकला नसल्याचे वृत्त आले होते. मात्र, सोमवारी या आमदारांनी पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी गोवा विधानसभेच्या कामकाजाला हजेरी लावली आणि सर्व काही ठीक असून आपण पक्षासोबत असल्याचा दावा केला.

मायकल लोबो यांना विरोधी पक्षनेतेपदावरुन हटवण्यात आले आहे

काँग्रेसने (Congress) मायकल लोबो आणि दिगंबर कामत यांच्यावर राज्यातील सत्ताधारी भाजपसोबत काँग्रेसच्या आमदारांमध्ये फूट पाडण्यासाठी षडयंत्र रचल्याचा आरोप करण्यात आला होता. काँग्रेसने मायकल लोबो यांची गोवा विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदावरुन हकालपट्टी केली आहे.

दुसरीकडे, दिनेश गुंडू राव यांनी रविवारी बोलावलेल्या बैठकीला काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे काही सदस्य उपस्थित न राहिल्यानंतर पाटकर यांनी सोमवारी विधानसभा अध्यक्ष रमेश तवडकर यांच्यासमोर दिगंबर कामत आणि मायकल लोबो यांना अपात्र ठरवण्यासाठी याचिका दाखल केली. याचिका मागे घेण्याच्या प्रश्नावर मुकुल वासनिक म्हणाले, 'हे सगळे प्रश्न आताच विचारु नका, नंतरही काही तरी सोडा.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Live: मुख्यमंत्र्य‍ांनी सभापतींना डोळे मारणे बंद करावे!

Goa Education: ABC म्हणजे 'रोमन कोकणी' नव्हे, देवनागरी कोकणीतून शाळा सुरू करण्यास सरकार देणार मदत; मुख्यमंत्र्यांनी केले स्पष्ट

'किमान मुख्यमंत्री, आमदाराला फोन करुन चौकशी करा, कोणालाही पैसे पाठवू नका'; मुख्यमंत्र्यांचे गोमंतकीयांना आवाहन

Power Outages in Goa: गोव्‍यात दिवसाला 37 वेळा वीजपुरवठा खंडित, पहा Video

Moths: फुलपाखरांसारखे दिवसा दिसत नसले तरी, रात्री बाहेर पडणाऱ्या 'पतंगांचे' स्थान महत्वाचे आहे..

SCROLL FOR NEXT