Pooja Naik Case Update Dainik Gomantak
गोवा

Cash For Job Scam: 'पूजा 420' ने आणखी एकाला फसवलं, पणजीमधल्या महिलेची 6 लाखांची फसवणूक

Pooja Naik Case Update: पूजा नाईकच्या विरोधात पणजी पोलिसांजवळ आणखीन एका गुन्ह्याची नोंद झाली आणि हा पूजाच्या विरोधात नोंदवण्यात आलेला चौथा गुन्हा आहे.

Akshata Chhatre

पणजी: गोव्यात अद्यापही पैसे घेऊन नोकरी देण्याचा प्रकार काही थांबण्याचं नाव घेत नाहीये, पूजा नाईकविरोधात नोंदवण्यात आलेल्या गुन्ह्याने एकूण प्रकरणावरचा पडदा उघडला आणि आता एका मागोमाग एक चेहरे समोर येत आहेत. पूजा नाईक हिचे गुन्हे देखील थांबण्याचं नाव घेत नाहीयेत शुक्रवार (दि. 14 नोव्हेंबर) रोजी पूजा नाईकच्या विरोधात पणजी पोलिसांजवळ आणखीन एका गुन्ह्याची नोंद झाली आणि पूजाच्या विरोधात नोंदवण्यात आलेला हा चौथा गुन्हा आहे.

पूजा नाईक विरुद्ध नोकरी देण्याचे आमिष दाखवून 6 लाखांना गंडा घातल्याची तक्रार पणजी पोलिसांत नोंद झाली आहे. कालापूर,तिसवाडी येथील सुषमा सदाशिव नाईकने ही तक्रार दाखल केली आहे. फिर्यादी सुषमा हिने नोंदवलेल्या तक्रारीनुसार पूजाने 6 सप्टेंबर ते 9 सप्टेंबर 2020 या काळात सरकारी नोकरी देण्याचे आमिष दाखवून तिच्याजवळून तब्बल 6 लाख रुपये घेतले होते.

टप्याटप्याने सुषमाने पूजाला पैसे देईल दिले मात्र तिला शेवटपर्यंत नोकरी काही मिळाली नाही आणि म्हणूनच तिने पोलीस ठाण्यात धाव घेतली. कलम 420च्या अंतर्गत पूजाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पूजाच्या बाबतीत रोज नव-नवे खुलासे होत आहेत आणि याचदरम्यान न्यायालयाने पूजाला मोठा झटका दिला. न्यायालयाने पूजाची थेट न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. केरी-फोंडा येथील श्रीधर सतरकर यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी न्यायालयाने पूजाला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

सतरकर यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी म्हार्दोळ पोलिसांनी पूजाविरुद्ध गुन्हा नोंदवला होता. पूजाच्या सरकारी नोकरीच्या जाळ्यात सुमारे शंभरजण अडकले असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. पूजाने या कामासाठी काही गावांमध्ये एजंट ठेवले होते आणि एजंटांमार्फत ती पैसे घेत होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nagarjuna At IFFI 2025: '..अजूनही देशात शिवा म्हणूनच हाक मारतात'! अभिनेते नागार्जुन यांचा दिलखुलास संवाद; उलगडला भावनिक प्रवास

मित्र मित्र गेले पोहायला, पाण्याचा अंदाज न आल्याने ओढवले संकट; दूधसागर नदीत बुडालेल्या 15 वर्षीय मुलाचा सापडला मृतदेह

Horoscope: प्रवास, संधी आणि नवीन दिशा! विद्यार्थ्यांसाठी दिवस उत्तम; व्यवसायिक लाभाचे संकेत

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर गोवा सरकारचा मोठा निर्णय; चार कनिष्ठ अधिकाऱ्यांची सेवा केली समाप्त!

Hong Kong Fire Video: हाँगकाँगमध्ये भीषण आग! 65 जणांचा मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची भीती; धडकी भरवणारा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT